दिवाळीनिमित्त अग्निशमन विभाग सज्ज; आयुक्तांचे सुरक्षित दिवाळीचे आवाहन

योगेश बरवड 
Saturday, 14 November 2020

दिवाळी साजरी करताना नागरिकांची तसेच त्यांच्या मालमत्तेचा आगीपासून बचाव करण्यासाठी यंदा अग्निशमन विभागाने तयारी केली आहे. नागरिक म्हणून सर्वांनीच काळजी घेऊन उत्सव साजरा करावा.

नागपूर, ः गेल्या काही वर्षात दिवाळीत आगीच्या घटनांत घट झाली असली तर पूर्णपणे थांबल्या नाहीत. यंदा दिवाळी कोरोनाच्या सावटात असली तर अग्निशमन विभागाने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज केली. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुरक्षेसह पर्यावरणपूरक ग्रीन दिवाळी साजरी केली.

दिवाळी साजरी करताना नागरिकांची तसेच त्यांच्या मालमत्तेचा आगीपासून बचाव करण्यासाठी यंदा अग्निशमन विभागाने तयारी केली आहे. नागरिक म्हणून सर्वांनीच काळजी घेऊन उत्सव साजरा करावा. एकीकडे कोव्हिडच्या संसर्गाची भीती आहे तर दुसरीकडे फटाक्यांमुळे होणारा धूर, त्यामुळे उद्भवणारे आजार आणि वाढत्या आगीच्या घटना ही चिंतेची बाब आहे. म्हणून फटाके टाळून पर्यावरणपूरक "ग्रीन" दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आयुक्त राधाकृष्‍णन बी. यांनी केली.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

मनपाने मोठ्या फटाके फोडण्यावर बंदी घातलेली आहे. परंतु काही प्रमाणात फटाके फोडले जाणार आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना घडतात. आग संबंधी दुर्घटना घडल्यास नागपूर महानगरपालिकेद्वारे १०१ हा टोल फ्री क्रमांक सुविधेमध्ये आहे.

मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात संपूर्ण अग्निशमन यंत्रणा सज्ज आहे. शहरात मागील दोन वर्षात फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटना अगदी कमी आहेत. मागील वर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यामुळे केवळ १ आगीची घटना घडली. त्यापूर्वी २०१८मध्ये २ घटना घडल्या आहेत.

ही संख्या शून्यावर येण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यासह इतर सर्व धूर करणारे फटाके टाळावे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होते, शिवाय फुफ्फुसावरही विपरीत परिणाम होतो. कोव्हिडच्या या संकटात फुफ्फुसांचे आरोग्य जपणे आवश्यक आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

अशी घ्या काळजी

- घरी किंवा घराजवळच्या परिसरात भंगार किंवा अन्य ज्वलनशील वस्तू ठेवू नका
- अर्धपेटलेले फटाके पुन्हा जाळू नये
- दिवे, अगरबत्ती किंवा मेणबत्ती जवळ फटाके ठेवू नये
- गवत काड्यांपासून बनलेले घराजवळ रॉकेट तथा अन्य उडणारी फटाके जाळू नये
- फटाके जाळताना जवळ बादलीभर पाणी आणि रेती ठेवा
- फटाके उडविताना घराची दारे, खिडक्या बंद ठेवा
-फटाके जाळताना सुती कपडे वापरा
- लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा

संपादन  -  अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire brigade department is ready for diwali