
नागपूर : कोरोना विषाणूची दहशत वर्षभरानंतरही कायम आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यात १० मार्च २०२० रोजी झालेल्या चाचणीतून पहिला कोरोनाबाधित नागपूर शहरात आढळून आला होता. त्यानंतर याच महिन्यात प्रथमच सार्वजनिक संचारबंदी लागू करण्यात आली होती. पहिला रुग्ण मेयोत दाखल झाल्यानंतर हळुहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. वर्षभरात सुमारे एक लाख ६० हजार कोरोनाबाधितांची नागपूर जिल्ह्यात नोंद झाली आहे.
त्यावेळी रुग्णांची संख्या कमी होती, परंतु हळुहळू परिस्थिती चिघळली. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला. वर्षभरानंतरही कोरोनाबाधितांची ही साखळी तुटलेली नाही. उलट संसर्गाची साखळी अधिक मजबूत झाली आहे.
१० मार्च रोजी झालेल्या चाचणीतून ११ मार्च २०२० रोजी नागपूर शहरातील बजाजनगर येथील रहिवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. तर १० मार्च रोजी त्यांनी मेयो रुग्णालयात नमुने दिले होते. अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांची पत्नीही कोरोनाबाधित झाली होती. दोघांनाही मेयोमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळजवळ एक महिना त्यांना मेयो रुग्णालयात दाखल ठेवण्यात आले होते.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप चिंता वाढवणारा आहे. जिल्ह्यात सद्या साडेअकरा हजार कोरोनाबाधित उपचार घेत असून यापैकी ९ हजार २०२ कोरोनाबाधित हे शहरातील विविध वस्त्यांमधील आहेत. कोरोनाचा कहर नागपुरात असताना गतवर्षीदेखील येवढी मोठी संख्या शहरात नव्हती. ग्रामीण भागात २ हजार २०१ कोरोनाबाधित आहेत. तर मंगळवारी (ता. ९) यात १ हजार ३ ३८ नवीन बाधितांची भर पडली आहे. तर ६ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
जिल्ह्यात एकूण रुग्णांतील ८०. ६४ टक्के (९ हजार २०२ ) शहरातील तर १९ टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. असे एकूण जिल्ह्यात ११ हजार ४११ सक्रिय कोरोनाबाधित उपचाराधिन आहेत. यापैकी ८ हजार ३७२ कोरोनाबाधित गृह विलगिकरणात उपचार घेत आहेत. हेच रुग्ण संसर्गाचे वाहक ठरत आहेत.
मात्र प्रशासनाकडून यांच्यावर कोणताही अंकुश लावण्यात येत नाही. केवळ दंडाची भाषा वापरली जात आहे. गंभीरावस्थेतील १ हजार ७०१ कोरोनाबाधितांवर मेडिकल, मेयो, एम्ससह विविध कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात आज दिवसभरात ७१३ जणांनी तर ग्रामीण भागातील २८४ जण असे एकूण ९९७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.