esakal | दुसऱ्या प्रेयसीसाठी पहिलीचा केला गर्भपात; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

First girlfriend abortion for second sweetheart Filed a crime against boyfriend

काही दिवसांनंतर नौशाद हा अन्य एका तरुणीसोबत फिरताना दिसला. त्यामुळे जाब विचारला असता त्याने वेळ मारून नेली. तरुणीने त्या तरुणीच्या घरापर्यंत पाठलाग करीत माहिती काढली.

दुसऱ्या प्रेयसीसाठी पहिलीचा केला गर्भपात; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : दुसऱ्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या प्रेयसीचा बळजबरी गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नौशाद मंसुरी नौशादी (२६, रा. रब्बानी शाळेजवळ, जुनी कामठी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तरुणी गोधनी परिसरात राहते. २०१८ मध्ये तिची ओळख नौशादशी झाली. दोघांची मैत्री झाली. दोघांच्या भेटी-गाठी होत गेल्या. वर्षभरानंतर २०१९ मध्ये नौशादने तिला सदरमध्ये राहणाऱ्या मित्राच्या खोलीवर नेले. मित्र बाहेर गेल्यानंतर नौशादने तिला प्रेमाची मागणी घातली. त्यानंतर तिला शारीरिक संबंधासाठी बाध्य केले. त्यानंतर तो तिला वारंवार मित्राच्या खोलीवर न्यायला लागला. त्यातून तिला गर्भधारणा झाली.

तिने नौशादला लग्नाची मागणी घातली. त्याने लग्नास टाळाटाळ केली. तिला गर्भपात केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवले. त्यामुळे तिने गर्भपात करण्यास संमती दर्शविली. त्यानंतर काही दिवसांपासून त्यांच्या प्रेमाची कुणकूण कुटुबीयांना लागली. त्यामुळे तरुणीने आई-वडिलांना नौशादशी लग्न करणार असल्याचे सांगितले.

जाणून घ्या - अख्खं गाव हळहळलं! पती-पत्नी पाठोपाठ मुलीचाही मृत्यू, एकाचवेळी निघाली तिघांची अंत्ययात्रा

काही दिवसांनंतर नौशाद हा अन्य एका तरुणीसोबत फिरताना दिसला. त्यामुळे जाब विचारला असता त्याने वेळ मारून नेली. तरुणीने त्या तरुणीच्या घरापर्यंत पाठलाग करीत माहिती काढली. त्या तरुणीसोबत नौशात ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचे कळले. त्यामुळे तिने नौशादला विचारणा केली. त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.