विमानतळ ठरले सोन्याची अंडी देणारी कोंबडी, काय असेल कारण?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

मागील वर्षभरात सीमा शुल्क विभागाने चार किलो 825 ग्रॅम सोने पकडले. या सोन्याची किंमत एक कोटी 51 लाख 66 हजार रुपये आहेत. गेल्या पाच वर्षांत एकाच दिवशी सर्वाधिक सोने पकडण्यात आल्याच्या तीन घटनांची नोंद करण्यात आली.

नागपूर : आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या तस्करीमुळे "कस्टम'कडून (सीमा शुल्क विभाग) विमानतळावर लक्ष केंद्रित केले जाते. यातूनच वर्षभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने दीड कोटीचे सोने पकडले आहेत. एकूण चार किलो 825 ग्रॅम सोने विविध नागरिकांकडून जप्त करण्यात आले. याशिवाय मोबाईल, लॅपटॉप आदी जप्त करण्यात आल्याने सीमा शुल्क विभागासाठी विमानतळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे. 

सीमा शुल्क विभागाच्या उपायुक्त कार्यालयाकडून माहिती अधिकारात देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांत चार कोटी 96 लाख 72 हजारांचे सोने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले. उपायुक्त कार्यालयाने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत सोने पकडल्याची 25 प्रकरणे नोंदविण्यात आली. यातील अकरा प्रकरणे केवळ मागील 2019-20 या वर्षातील आहेत. 

क्लिक करा - ही खास कॉफी पळवणार तुमचे टेन्शन...वाचा

मागील वर्षभरात सीमा शुल्क विभागाने चार किलो 825 ग्रॅम सोने पकडले. या सोन्याची किंमत एक कोटी 51 लाख 66 हजार रुपये आहेत. गेल्या पाच वर्षांत एकाच दिवशी सर्वाधिक सोने पकडण्यात आल्याच्या तीन घटनांची नोंद करण्यात आली. यात 30 जून 2015 रोजी तीन किलो सोने पकडण्यात आले. 5 नोव्हेंबर 2014 रोजी 2 किलो 723 किलो तर 23 मार्च 2014 रोजी 1 किलो 481 ग्रॅम सोने पकडण्यात आले. गेल्या पाच वर्षांतील ही तीन मोठी प्रकरणे आहेत. 

2017 मध्ये एकही नोंद नाही

उपायुक्त कार्यालयाने 2013 ते जानेवारी 2020 पर्यंत सोने पकडल्याच्या घटनांची माहिती दिली. यात 2017 मध्ये सोने पकडल्याच्या एकाही घटनेची नोंद नाही. 2013 मध्ये 58 लाखांचे, 2014 मध्ये एक कोटी 37 लाख 74 हजार, 2015 मध्ये 74 लाख, 2016 मध्ये 21 लाख, 51 लाख 79 हजार 353 रुपयांचे सोने पकडण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five kg of gold seized from Nagpur airport