"स्मार्ट सिटी'ला कुणी दिला धक्का, काय झाले नेमके...वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

लॉकडाउन त्यात हा निर्णय यामुळे खरेच आपण स्मार्ट राहू का हा विचार आता अनेकांच्या मनात येऊ लागला आहे. यासाठी केवळ एक व्यक्ती जबाबदार आहे, अशी भावना अनेकांची झाली आहे.

नागपूर : अचानक एका निर्णयामुळे नागपूर शहराचा स्मार्टनेस बिघडला आहे. अनेकांना यामुळे धक्का बसला आहे. पुढे काय होईल, या चिंतेत अनेक जण आहेत. कोरोनाचे संकट, लॉकडाउन त्यात हा निर्णय यामुळे खरेच आपण स्मार्ट राहू का हा विचार आता अनेकांच्या मनात येऊ लागला आहे. यासाठी केवळ एक व्यक्ती जबाबदार आहे, अशी भावना अनेकांची झाली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेली एसपीव्ही कंपनी नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडमधील (एनएसएससीडीसीएल) पाच अधिकाऱ्यांना आज घरी बसविण्यात आले. एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे. एनएसएससीडीसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आहे.
केंद्र सरकारने 100 स्मार्ट सिटी तयार करण्याचा निर्धार केला. यात नागपूरचाही समावेश आहे. नागपूरच्या प्रकल्पासाठी एनएसएससीडीसीएल या कंपनीची स्थापना करण्यात आली. पूर्व नागपुरातील सतराशे एकर जागेवर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू आहे.

वाचा - कोरोबाधित आढळला अन्‌ हृदयविभाग हादरला, वाचा काय झाला प्रकार...

केंद्र व राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधीही दिला. या कंपनीतील महाव्यवस्थापक (पायाभूत सुविधा) घिये, पर्यावरण विभागातील महाव्यवस्थापक महाजन, तांत्रिक अधिकारी अमोल गुजर, प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी सुशील बारई व मुख्य माहिती अधिकारी शुभांगी गाढवे यांना घरी पाठविण्यात आले. तसेच या प्रकल्पातील आणखी एक अधिकारी बनगिनवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकताच महापालिकेतील ग्रंथालय विभागातील कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. त्यामुळे महापालिकेतील एकूणच कर्मचारी व अधिकारी दहशतीत आहेत. आज अचानक कंपनीतून काढल्याने या अधिकाऱ्यांवर मोठा आघात झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five officers sacked in Smart city project