स्पा, सलूनच्या आड देहव्यापार करणाऱ्या पाच तरुणी ताब्यात

अनिल कांबळे
Monday, 5 October 2020

वाडी परिसरात अनेक महिला दलालांनी स्पा आणि ब्युटीपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू केले आहेत. त्या सेक्स रॅकेट्सला वाडी पोलिसांचे पाठबळ असल्याची माहिती आहे.

नागपूर  ः वाडीतील अमरावती रोड नाका नं.  १० जवळ असलेल्या फर्स्ट स्टेप स्पा आणि सलूनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर एसएसबीने छापा घातला. या छाप्यात पाच तरुणींना वेश्‍याव्यवसाय करताना ताब्यात घेतले. तसेच देहव्यापार करवून घेणाऱ्या एका महिलेला अटक केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी परिसरात अनेक महिला दलालांनी स्पा आणि ब्युटीपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू केले आहेत. त्या सेक्स रॅकेट्सला वाडी पोलिसांचे पाठबळ असल्याची माहिती आहे. बबिता कन्हैया चव्हाण हिने गेल्या तीन वर्षापासून अमरावती रोडवर नाका नंबर १० जवळ फर्स्ट स्टेप स्पा आणि सलून नावाने सेक्स रॅकेट सुरू केले होते. 

जाणून घ्या - मन सुन्न करणारी घटना!  अंत्यसंस्कारनंतर भिक्षेकऱ्याच्या अंगावर फेकून दिली पीपीई किट; स्मशानभूमीतील दुर्दैवी वास्तव
 

तेथे पाच तरुणी देहव्यापार करीत होत्या. त्या तरुणींना ग्राहक शोधण्याचे काम बबीता करीत होती. गुन्हे शाखेच्या पीआय तृप्ती सोनवणे, स्मिता सोनवणे, पीएसआय अतुल इंगोले यांच्या पथकाला माहिती मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक-पंटर पाठवून बबीताची भेट घेतली. 

बबीताला दोन तरुणींसाठी सौदा केला. तिने लगेच पैसे स्वीकारले आणि ग्राहकाला पार्लरमध्ये घेतले. त्याला पाच तरुणींना दाखविण्यात आले. त्यापैकी दोन तरुणींची निवड करण्यात आली. पंटरने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी छापा घातला. पाच तरुणींना वेश्‍याव्यवसाय करताना ताब्यात घेतले. त्यापैकी दोन तरुणी गेल्या तीन वर्षांपासून देहव्यापार करीत होत्या. 

खुशीने केले `सेट’

काचीमेट परिसरात खुशी नावाच्या महिलेचे सेक्स रॅकेट सुरू आहे. गेल्या ८ ते १० वर्षांपासून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या खुशीने वाडी ठाण्यातील काही जणांना ‘सेट’ केले आहे. त्यामुळे पॉश डुप्लेक्समध्ये खुशी बिनधास्त सेक्स रॅकेट चालवीत असल्याची चर्चा आहे. खुशीला रॅकेट चालविण्याच्या गुन्ह्यात तीन वेळा पोलिसांनी अटक केली होती तसेच तिने एसीबीमध्ये तक्रार केल्यानंतर एका पीआय आणि हवालदाराचा गेम केला होता, हे विशेष.

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five young women were detained from a saloon in Wadi