महावितरण छळतेय ग्राहकांना, तीन नव्हे तर चक्‍क चार महिन्यांचे पाठवले बिल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

एखाद्याला मासिक बिल सरासरी येत असेल तर त्याला चार महिन्यांचे आठ ते दहा हजार यायला पाहिजे. मात्र, अशा ग्राहकांना 20 हजार रुपये बिल धाडण्यात आले आहे. ते इतके कसे वाढले याची शहनिशा करणे गरजेचे आहे.

नागपूर : लॉकडाउनच्या काळात अनेकांनी ऑनलाइन सरासरी बिल भरले. त्यांनाही चार महिन्यांचे बिल पाठविण्यात आले. आता आधी बिल भरा नंतर दुरुस्ती करू असे सांगण्यात येत आहेत. यासाठी त्यांनाच मुख्यालयात चकरा माराव्या लागत आहे. वेळ नसल्याने व त्रास वाचावा म्हणून ऑनलाइन बिल भरण्याची व्यवस्था महावितरणनेच करून दिली आहे. आता नसते बिल भरले तर बरे झाले असते, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. 

नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. लॉकडाउनमुळे हा विषय बाजूला ठेवून त्यांनी फक्त वीजबिल भरण्यात मुभा दिली होती. मात्र, आता सरसकट ते वसूल केले जात आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय बुडाले आहेत. अशा परिस्थितीत भरमसाट वीजबिल पाठवून त्यांना आणखीच मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक घटना! आठ महिन्यांची गर्भवती गेली रुग्णालयातून पळून; भूमकाजवळ गेली असता झाला अंत

एखाद्याला मासिक बिल सरासरी येत असेल तर त्याला चार महिन्यांचे आठ ते दहा हजार यायला पाहिजे. मात्र, अशा ग्राहकांना 20 हजार रुपये बिल धाडण्यात आले आहे. ते इतके कसे वाढले याची शहनिशा करणे गरजेचे आहे. यासाठी तत्काळ विद्युत विभागाची बैठक घेऊन त्यात सुधारणा करण्याचे आदेश देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही कृष्णा खोपडे यांनी केली आहे. 

उर्जामत्र्यांनी घालावे लक्ष

लॉकडाउनच्या काळात बंद असलेले मीटर रीडिंग सुरू होताच वीजबिलाची रक्कम बघून नागरिकांना जोरदार शॉक बसला आहे. जवळपास सर्वच जणांना वीजबिलाची रक्कम दुप्पट-तिप्पट पाठवली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four month bill to the customer from the electricity distribution company