मोठी बातमी : युवकाचा 'फिल्मी स्टाईल'ने तलवारीने भोसकून खून

four youth killed a boy in Nagpur
four youth killed a boy in Nagpur

नागपूर : सक्‍करदरा परिसरात वर्चस्वाच्या वादातून चार कुख्यात गुंडांनी वस्तीतील दादागिरी आणि दबदबा कायम ठेवण्यासाठी एका युवकाचा "फिल्मी स्टाईल'ने तलवारीने भोसकून खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोमवारी क्‍वॉटर्स परिसरात घडली. गौरव विनोद खडतकर (वय 28, रा. सोमवारी क्‍वॉटर्स) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हत्याकांडात सक्‍करदरा पोलिसांनी चौघांना अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव खडतकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याचा परिसरात चांगला दबदबा होता. आरोपी कार्तिक उमेश चौबे (वय 24, रा. सोमवारी क्‍वॉर्टर) हा कुख्यात आरोपी आहे. सध्या पोलिस दप्तरी तो तडीपार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

वस्तीत दादागिरी आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी गौरव आणि कार्तिक चौबे यांच्यात वाद सुरू होता. कार्तिक हा टोळी करून राहत असल्यामुळे त्याला गौरवला हाताखाली काम करण्यासाठी दबाव टाकत होता. तसेच वस्तीतील काही भाग वाटून घेण्याबाबतही गौरवशी वाद घालत होता. सोमवारी "मांडवली' करण्यासाठी कार्तिकने गौरवला बोलावले. "अपून एक दुसरे के फटे में टांग नही अडायेंगे... इलाका बाट लेते हैं' असे बोलून रात्री बारा वाजता भेटायला बोलावले. 

सोमवारी क्‍वॉटर्ससमोरील मैदानात आरोपी कार्तिक चौबे आणि त्याचे साथिदार शहबाज उर्फ बाबू मुस्तफा खान (वय 25), राजा उर्फ साहिल शेख बाबा (25, ताजनगर) आणि मृणाल शिरीष भापकर (वय 25, ताजगनर) हे दारू पीत बसले होते. दुचाकी घेऊन गौरव खडतकर तेथे पोहोचला. वस्तीतील दुकानदार, अवैध धंदेवाले आणि दारू विक्रेत्यांकडून पैसे वसुली करण्यावरून चौघांनी गौरवशी वाद घातला.

"तू धंदे से अब हट जा... अब ये हमारा इलाका हैं' असे म्हणून गौरव माफी मागण्यास सांगितले. त्यावर चिडून गौरवने कार्तिकला शिवीगाळ केली. कार्तिक व त्याच्या साथिदारांनी तलवार, चाकू, दंडे आणि दगडाने गौरववर हल्ला केला. त्याचा जागीच खात्मा केला आणि पळून गेले. पहाटेच्या सुमारास हत्याकांड उघडकीस आले. सक्‍कदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली. 

आरोपीचे घर पटेविण्याचा प्रयत्न

गौरवचा "गेम' केल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे नवा दादा असलेल्या कार्तिकच्या घरावर 10 ते 12 युवक शस्त्रासह पोहोचले होते. त्यांनी कार्तिकच्या घरावर दगडफेक करून तोडफोड केली. त्यानंतर त्याचे घर पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वेळीच पोलिस पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

तडीपार आरोपी शहरात कसा?

सध्या शहरात ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गुन्हे शाखेसह स्टेशनमधील कर्मचारी गुन्हेगारांना तपासत आहेत. एवढे असूनही तडीपार असलेला कार्तिक चौबे हा कुख्यात गुन्हेगार शहरात कसा, असा प्रश्‍न पडला आहे. यावरून पोलिस आयुक्‍तांच्या आदेशाला पोलिस कर्मचारी जुमानत असल्याचे चित्र दिसत आहेत. अन्यथा सहा ते सात महिन्यांपूर्वी डीसीपी झोन 4 यांनी कार्तिकला तडीपार करून वर्धा येथे सोडले होते, अशी माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com