लोभाने केला घात, गमावले तब्बल १२ लाख रुपये

Fraud of railway officer for twelve lakh rupees
Fraud of railway officer for twelve lakh rupees

नागपूर  ः रेल्वेतील अधिकाऱ्याला ४० लाखांचा बोनस मिळविण्याचा लोभ नडला. ४० लाख मिळविण्यासाठी अधिकाऱ्याला एका टोळीने १२ लाखांचा गंडा घातला. ही घटना शांतीनगरात उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर त्रिनाथराव सारापल्ली (५०, जरीपटका) हे इतवारी रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रीशियन पदावर कार्यरत आहेत. आठ मार्चला त्यांना एक कॉल आला. त्याने फोनवरून ४० लाखांचा एलआयसीचा बोनस मिळत असल्याचे सांगितले. चंद्रशेखर यांना ४० लाख मिळत असल्याचा लोभ सुटला. 

त्यांनी लगेच कागदपत्रे आणि बॅंकेचे डिटेल्स त्याला दिले. आरोपीने बोनस मिळविण्यासाठी १ लाख १९ हजार रुपये कंपनीच्या खात्यात भरावे लागणार अशी अट घातली. ४० लाख मिळणार असल्याने लालसेपोटी ते पैसे भरण्यास तयार झाले. सी. एल. यादव या तोतया अधिकाऱ्याने सारापल्ली यांना फोन केला आणि आरबीआयमधून बोलत असल्याचे सांगितले. 

त्याने पंजाब नॅशनल बॅंकेचे खाते क्रमांक सारापल्ली यांना दिले. त्यांनी आरोपीने दिलेल्या बॅंक खात्यात सारापल्ली यांनी पैसे भरले. १९ जून २०२० पर्यंत यादव याने वेगवेगळी कारण देत सारापल्ली यांना वेगवेगळ्या बॅंक खात्यात ११ लाख ६४ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. आठवडाभरात तुमच्या खात्यात ४० लाख जमा होतील, असे सांगून आरोपी यादवने फोन बंद केला. तेव्हापासून आरोपीचा फोन लागत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सारापल्ली यांनी शांतीनगर पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : अतुल मांगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com