esakal | Video : नागपुरात पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा? सीसीटीव्हीत कैद झाली मारामारी, बघा...
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur freestyle

युवतीने युवकावर हात उगारल्यामुळे तिच्या अन्य तीन मैत्रिणींनी धाव घेतली. तिघींनीही युवकाला मारहाण करण्यास सुरूवात केली. मित्राला होणारी मारहाण पाहून युवकाच्या मित्रांनीही युवतींना मारहाण करण्यास सुरूवात केली. तरुणींच्या समुहातील एका तरुणीने बचावासाठी पेट्रोल पंपावरील आग विझवण्याचे सिलेंडर हातात घेऊन मारहाण करणाऱ्या तरुणावर हल्ला केला. युवकांनीही स्वतःचा बचावासाठी युवतींना मारहाण केली. त्यानंतर युवकांनी पळ काढला.

Video : नागपुरात पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा? सीसीटीव्हीत कैद झाली मारामारी, बघा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : पेट्रोल पंपावर दुचाकी रांगेत लावण्याच्या वादातून चार तरूणी आणि तीन तरूणांमध्ये चांगलीच "फ्री स्टाईल' झाली. त्या युवकांनी तरूणींना मारहाण केली. या प्रकाराची सुरूवात तरूणींनीच केली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी विनयभंगासह गुन्हे दाखल केले. ही घटना होळीच्या दिवशी घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. 10 मार्च रोजी वाडी येथील एका पेट्रोल पंपावर तीन युवक दोन दुचाकींमध्ये पेट्रोल भरायला आले होते. दरम्यान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना वाहन नीट न लावल्याच्या मुद्द्यावरून आरोपी तरुण आणि तरुणींमध्ये वाद झाला होता. तरूण काढता पाय घेण्यासाठी दुचाकी घेऊन समोर गेले. दरम्यान एका तरूणीने युवकाच्या गाडीजवळ येऊन जाब विचारण्यास सुरूवात केली. तरूणींच्या नादी लागण्यापेक्षा युवकांनी दुचाकी घेऊन निघण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणीने आरडाओरड करीत अंगावर धाव घेत शिवीगाळ केली. त्यामुळे तो युवक चिडला. त्याने रागाच्या भरात युवतीच्या कानाखाली वाजवली. त्यामुळे चिडलेल्या युवतीनेही युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

युवतीने युवकावर हात उगारल्यामुळे तिच्या अन्य तीन मैत्रिणींनी धाव घेतली. तिघींनीही युवकाला मारहाण करण्यास सुरूवात केली. मित्राला होणारी मारहाण पाहून युवकाच्या मित्रांनीही युवतींना मारहाण करण्यास सुरूवात केली. तरुणींच्या समुहातील एका तरुणीने बचावासाठी पेट्रोल पंपावरील आग विझवण्याचे सिलेंडर हातात घेऊन मारहाण करणाऱ्या तरुणावर हल्ला केला. युवकांनीही स्वतःचा बचावासाठी युवतींना मारहाण केली. त्यानंतर युवकांनी पळ काढला.

Corona Virus : पाळीव प्राण्यांसाठी पुढे आला समीर, म्हणतो "मी सांभाळतो तुमच्या प्राण्यांना"

नागरिकांनी घेतली बघ्यांची भूमिका
तरुण-तरुणींच्या गटात जेव्हा मारहाण सुरू होती तेव्हा तिथे कर्मचारी आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक हे बघ्याच्या भूमिकेत होते. तरुणींना अधिकच मारहाण होताना एक-दोन व्यक्तींनी मध्यस्ती करून तरुणींची सुटका केली. परंतु, या दोन्ही तरुणांनी तरुणींना बेदम मारहाण केली होती. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर जखमी तरुणींनी पोलिसस्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या घटनेत जखमी तरूणीच्या तक्रारीवर हल्लेखोर तरुणांवर मारहाण, विनयभंग सारखे गुन्हे नोंदवून दोघांना अटक केली आहे. तर एक जण फरार असल्याची माहिती आहे.