esakal | Corona Virus : पाळीव प्राण्यांसाठी पुढे आला समीर, म्हणतो "मी सांभाळतो तुमच्या प्राण्यांना"

बोलून बातमी शोधा

dog

प्राण्यांना पोसणे , सांभाळणे फार खार्चिक गोष्ट आहे. प्राण्यांच्या मूळ अनेक आजार होतात असे सांगितले जाते त्यातच आता तर कोरोना व्हायरसचे संकट, त्यामुळे अनेक जण तातडीने या सर्व पाळीव  प्राण्यांना जंगलात किंव्हा इतर ठिकाणी सोडत आहेत. त्यामुळे हे पाळीव प्राणि सुद्धा बेघर होत आहेत. या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर ना सोडता मला दत्तक  द्या असे आवाहन अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचा संचालक समीर जनवंजाळ याने केले आहे.

Corona Virus : पाळीव प्राण्यांसाठी पुढे आला समीर, म्हणतो "मी सांभाळतो तुमच्या प्राण्यांना"
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमरावती : संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलेल्या कोरोना व्हायरसची सर्वत्र धास्ती पसरली आहे. हा व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगून सुद्धा अनेक लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना तसेच इतर प्राण्यांना घरात ठेवण्यास तयार नाहीत,असं चित्र दिसत आहे. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागलाय. याच गोष्टींचा परिमाण लक्षत घेता अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचा संचालक समीर जवंजाळ याने आपले प्राणी बाहेर रस्त्यावर किव्हा जंगलात न सोडता "आम्हला दत्तक द्या आम्ही त्याना पोसतो" असे आवाहन केले आहे.

प्राण्यांना पोसणे , सांभाळणे फार खार्चिक गोष्ट आहे. प्राण्यांच्या मूळ अनेक आजार होतात असे सांगितले जाते त्यातच आता तर कोरोना व्हायरसचे संकट, त्यामुळे अनेक जण तातडीने या सर्व पाळीव  प्राण्यांना जंगलात किंव्हा इतर ठिकाणी सोडत आहेत. त्यामुळे हे पाळीव प्राणि सुद्धा बेघर होत आहेत. या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर ना सोडता मला दत्तक  द्या असे आवाहन अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपचा संचालक समीर जनवंजाळ याने केले आहे.

पाळीव प्राण्यांना सुद्धा बसतोय कोरोनाचा फटका
एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे लक्षात आल्यास, त्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे ठेवले जाते. परिणामी त्यानं समजा कुत्रा किंवा इतर प्राणी पाळला असेल, तर त्याच्यावर बेघर होण्याची वेळ अली आहे. या कोरोना व्हायरस मूळ आली आहे. त्यामुळे अनेक जण आता आपले पाळीव प्राणी समीरकडे विश्वासने आणून देत आहेत.

सध्या वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे  अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना  या व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. प्राण्यांपासून हा रोग पसरत असल्याची माहिती  सगळीकडे पसरल्याने आता  काही लोकांनी आपल्याच घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर काढले जात आहे. अशातच समीरने उचललेले पाऊल अत्यंत प्रेरणादायी असून त्याचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे.