जीवलग मित्राने दिला दगा; गर्भवती झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

Tuesday, 27 October 2020

प्राची पिल्लेवार ही पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. वडील खासगी काम करतात तर आई गृहिणी आहे. तिचे वस्तीत राहणाऱ्या एका युवकासोबत मैत्री होती. त्याच्यासोबत चॅटिंग करताना ती प्रेमात पडली.

नागपूर  ः प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीशी शारीरिस संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली. आई-वडील आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीपोटी त्या १९ वर्षीय युवतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना वाठोडा परिसरात उघडकीस आली. प्राची पिल्लेवार (साहीलनगर, वाठोडा) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची पिल्लेवार ही पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. वडील खासगी काम करतात तर आई गृहिणी आहे. तिचे वस्तीत राहणाऱ्या एका युवकासोबत मैत्री होती. त्याच्यासोबत चॅटिंग करताना ती प्रेमात पडली. दोघांच्याही भेटी व्हायला लागल्या. त्याचे प्रेमसंबंध वस्तीपर्यंत पोहचले. त्यामुळे प्रियकराने तिला लग्न करण्याचे आमिष दिले. 

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का
 

तिचा पूर्ण विश्‍वास त्याच्यावर बसला. घरी कुणी नसताना तो घरी यायला लागला. लग्न करणार असल्यामुळे त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच प्राचीला तो स्वतःच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्यातून ती गर्भवती राहिली. सुरुवातीला ती गोंधळात पडली. घाबरलेल्या अवस्थेत तिने प्रियकराला फोन केला आणि गर्भवती असल्याची माहिती दिली. त्याने लगेच हात झटकत ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे ती खचली. 

आता आई-वडील ओरडतील आणि समाजातही बदनामी होईल, अशी भीती तिच्या मनात होती. त्यामुळे तिने थेट आत्महत्या करण्याचा पर्याय स्वीकारला. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरात कुणीही नसताना प्राचीने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी प्रथमदर्शनी आत्महत्याची नोंद केली आहे. तिच्या प्रियकराचा शोध पोलिस घेत असून, तिने लिहिलेली सुसाईड नोट किंवा मोबाईलमधील चॅटिंगवरून प्रियकराचा शोध पोलिस घेत आहेत. प्राचीचा सीडीआर काढण्यात येणार असून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend cheated young girl commits suicide