चक्क पोलिस आयुक्तांच्याच नावाने उघडले बनावट फेसबुक अकाउंट, अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने खळबळ

अनिल कांबळे
Friday, 22 January 2021

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी अमितेशकुमार यांच्या नावाचे बनावट एफबी अकाऊंट उघडण्यात आले. त्याद्वारे अमितेशकुमार यांच्या ओळखीच्या ३२ जणांना 'फ्रेण्ड रिक्वेस्ट' पाठविण्यात आली.

नागपूर :  नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे उशिरा रात्री उघडकीस आले. त्यामुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली. सायबर सेलने या प्रकाराची गंभीर दखल घेत बनावट अकाऊंट उघडणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. 

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी अमितेशकुमार यांच्या नावाचे बनावट एफबी अकाऊंट उघडण्यात आले. त्याद्वारे अमितेशकुमार यांच्या ओळखीच्या ३२ जणांना 'फ्रेण्ड रिक्वेस्ट' पाठविण्यात आली. काहींनी ती 'अॅक्सेप्ट' केली. दरम्यान आधीच 'फेसबुक फ्रेण्ड' असताना पुन्हा 'फ्रेण्ड रिक्वेस्ट' आल्याने त्यांच्या काही मित्रांनी अमितेशकुमार यांच्याशी थेट संपर्क साधला. आपण कोणत्याही प्रकारची 'फ्रेण्ड रिक्वेस्ट' पाठविली नसल्याचे अमितेशकुमार यांनी त्यांना सांगितले.  हा बनावटपणा उघडकीस येताच अमितेशकुमार यांनी लगेच सायबर सेलला याबाबत कळविले. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. उशिरारात्रीपर्यंत या बनावट फेसवुक अकाऊंटबाबत पोलिस दलात मात्र चर्चा सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend request from fake facebook account of police commissioner amitesh kumar in nagpur