मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

अनिल कांबळे
Friday, 22 January 2021

प्रदीपला इतवारी मार्गाने घेऊन जात असता एका प्रतिष्ठानसमोर दोन पोलिस दिसले. पोलिसांना पाहून प्रदीपने दुचाकीवरून उडी घेतली आणि जीव मुठीत घेऊन पळाला.

नागपूर : आईशी असलेले प्रेमसंबंध खटकल्यामुळे मुलाने दोन मित्रांच्या मदतीने आईच्या प्रियकराच्या अपहरणाचा कट रचला. दुकानातून दुचाकीने त्याचे अपहरण केले. त्याला मारहाण करीत असतानाच त्याने पळ काढत थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर मुलाच्या आईने त्याची समजूत घातली. हा नाट्यमय प्रकार बुधवारी रात्री घडला. 

हेही वाचा - अन् पराभूत उमेदवार झाला विजयी; ३ दिवसांच्या आंनदोत्सवावर विरजण; नक्की काय घडला प्रकार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप नंदन (२५) हा जागनाथ बुथवारी येथील कपड्याच्या दुकानात काम करतो. त्याचे वस्तीतील एका ३४ वर्षांच्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. तिला एक मुलगा असून त्याचे वडील सोडून गेले आहेत. प्रदीप हा नेहमी घरी येत होता. मुलाला हे खटकत होते. यापुढे घरी येऊ न नको, असे प्रदीपला सुनावले. मात्र, प्रदीपचे घरी येणे काही थांबले नाही. तसेच आईसोबत प्रेमसंबंध असल्याचे मुलाला कळले. त्याने प्रदीपला धडा शिकविण्यासाठी कट रचला. दोन मित्रांना कटात सामील करून घेतले. १९ जानेवारीला रात्री आठ वाजता तिघे जण जागनाथ बुधवारीतील कापड दुकानात पोहचले. त्यांनी प्रदीपला बाहेर बोलावले आणि दुचाकीवरून त्याचे अपहरण केले. 

हेही वाचा - भाजपमध्ये लवकरच फाटाफूट! ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचा पक्षाला राम-राम करण्याचा...

प्रदीपला इतवारी मार्गाने घेऊन जात असता एका प्रतिष्ठानसमोर दोन पोलिस दिसले. पोलिसांना पाहून प्रदीपने दुचाकीवरून उडी घेतली आणि जीव मुठीत घेऊन पळाला. प्रदीपने त्वरित प्रेयसीला फोन लावत झाल्या प्रकाराची माहिती दिली. प्रेयसीने तहसिल पोलिसांना कळविले. माहितीवरून ठाणेदार जयेश भांडारकर यांनी पोलिसांना यशोधरानगरातील महिलेच्या घरी पाठवले. प्रदीप व त्याची प्रेयसी तहसील पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पवन कोराडकर (३१) यास अटक केली. तसेच आरोपीच्या ताब्यातून पीडितेचा मोबाईल घेतला. विधीसंघर्ष बालकांना त्यांच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात आले. आईने मुलाची पुन्हा समजूत घालून घरी नेले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son kidnapped mother friend in nagpur crime news