esakal | "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...
sakal

बोलून बातमी शोधा

file

पाणी जास्त पाहून त्याच्या मित्रांनी पाण्यात उतरण्यासाठी माघार घेतली. परंतू बादल या तेरा वर्षीय मुलाने थेट कालव्यात उडी घेतली. तो वर न आल्याचे पाहून मित्र घाबरले आणि बादलचे कपडे घेउन घराकडे पळाले. आणि मग घडले असे.

"त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...

sakal_logo
By
रितेश बिरणवार

नगरधन (जि.नागपूर) :  "तो' आणि त्याचे मित्र कालव्याला पाणी आल्यामुळे पोहायला गेले. पाणी जास्त पाहून त्याच्या मित्रांनी पाण्यात उतरण्यासाठी माघार घेतली. परंतू बादल या तेरा वर्षीय मुलाने थेट कालव्यात उडी घेतली. तो वर न आल्याचे पाहून मित्र घाबरले आणि बादलचे कपडे घेउन घराकडे पळाले. आणि मग घडले असे.

अधिक वाचा : तरीही...टोलनाक्‍यावर होते, सक्‍तीची वसुली...

..आणि मित्रांनी काढला पळ
बादल शिवलाल ठकरेले (वय13,हमलापुरी) असे त्या बालकाचे नाव आहे.
बादल नंदिवर्धन विद्यालयात आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. सदया शेतीच्या कामासाठी पेंचमधून कालव्याला पाणी सोडण्यात आले. कालव्याला पाणी सुटल्यानंतर आसपासच्या परिसरातील मुले कालव्यात पोहायला नेहमी जातात. बादल व त्याच्या दोन मित्रांनी पोहायला जाण्याची योजना आखली. कालव्याजवळ पोहचल्यावर त्या कालव्याचा वेग आणि पाण्याची खोली पाहून बादलसोबत असलेल्या दोन मित्रांची पाण्यात उडी घेण्याची हिंमत झाली नाही. परंतू बादलने अंगातील कपडे काढून थेट पाण्यात उडी घेतली. पण पाण्याचा वेग इतका जास्त होता की त्याला पाण्याखाली गेल्यावर वर येता आलेच नाही. खूप वेळ झाल्यानंतर तो वर न आल्याचे पाहून मित्र घाबरले. त्या भीतीनेच त्यांनी बादलचे कपडे घेऊन कालव्याजवळून पळ काढला.

अधिक वाचा : खुद्‌द दोन पोलिस कर्मचारी अडकले जाळयात, काय केले होते त्यांनी...

भीतीपोटी लपवले कपडे
भीतीपोटी त्यांनी रस्त्यात कुठेतरी त्याचे कपडे लपवून घरी परत गेले. सायंकाळ होऊनसुद्धा बादल घरी पोहचला नाही, म्हणून घरच्यांची आणि त्याची आई धनवंतीबाईची चिंता वाढली. तिने बादलचा शोध घेण सुरु केले. सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृतदेह कालव्यात सापडला असल्याची माहिती तिच्या कानावर पडताच तिच्यावर जणू आभाळच कोसळले. तिने जोरात हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. गावात शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 धक्‍कादायक : जिल्हयातील "हे' तालुके ठरले सदया "टॉपर', कशात ते वाचा...

अकरा वर्षापूर्वी पतीचे निधन
घटनेनंतर मृत बादलच्या आईची प्रत्येक जण सांत्वना करीत होता. परंतू तिच्या एकुलत्या एक बादलच्या जाण्याने तिचे स्वप्नच मातीत मिळाले आहे. अकरा वर्षापूर्वी तिचे पती शिवलाल ठकरेले यांचे निधन झाले होते. बादल हा तिचा जगण्याचा आधार होता. मुलगा मोठा होऊन मला आसरा देईल, अशी तिची स्वप्न होते. शेतात रोजीमाजुरी करून स्वतःच्या मुलाचा ती उदरनिर्वाह करीत होती. तिचा हंबरडा पाहून सगळयांची मने व्याकुळ झाली होती.

संपादन : विजयकुमार राऊत

go to top