तरुणाईसाठी खुशखबर! फुटाळ्याच्या चेहरामोहरा बदलणार, प्रेक्षक गॅलरीसह संगीत कांरजे वाढविणार आकर्षण

राजेश प्रायकर
Saturday, 3 October 2020

फुटाळा तलाव परिसराकडे तरुणाईचे पाय उत्साहाने वळतात. या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने महामेट्रोकडे दिले आहे. झिरो माईल सौंदर्यीकरण तसेच आकर्षक मेट्रो स्टेशन तयार करणाऱ्या महामेट्रोने फुटाळा तलाव सौंदर्यीकरणाचाही विडा विचलला.

नागपूर : शहराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महामेट्रोने फुटाळा तलाव परिसराच्या सौंदर्यीकरणाला वेग दिला आहे. नागपूरकर, विशेषतः तरुणाईचे आवडते ठिकाण असलेल्या फुटाळा तलाव परिसरात महामेट्रोने रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण केले. याशिवाय येथे प्रेक्षक गॅलरी, संगीत कारंजेही प्रस्तावित असून फुटाळा तलाव परिसर आणखी रम्य होणार आहे. 

फुटाळा तलाव परिसराकडे तरुणाईचे पाय उत्साहाने वळतात. या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने महामेट्रोकडे दिले आहे. झिरो माईल सौंदर्यीकरण तसेच आकर्षक मेट्रो स्टेशन तयार करणाऱ्या महामेट्रोने फुटाळा तलाव सौंदर्यीकरणाचाही विडा विचलला. नुकताच केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला. या बैठकीत महामेट्रोने प्रकल्पाचे सादरीकरण केले. गडकरी यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. या प्रकल्पांतर्गत सिमेंट रस्ता, ड्रेनेज लाईन आणि प्रेक्षक गॅलरीचे काम सुरू आहे. या रस्त्याची एकूण लांबी २.८६० कि.मी असून रुंदी १८ मीटर व २४ मीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूमिगत सेवा वाहिन्या पेव्हर ब्लॉकने आच्छादित करण्यात येणार आहे. या 

हेही वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर 

रस्त्याचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे महामेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पथदिवे राहणार असून ड्रेनेजवर फूटपाथ राहणार आहे. प्रेक्षक गॅलरीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली. ३५० मीटर लांबीच्या प्रेक्षक गॅलरीत एकाचवेळी चार हजार नागरिक संगीत कारंज्यांचा आनंद लुटू शकणार आहे. प्रेक्षक गॅलरीला सहा प्रवेशद्वार असून तिकिट विक्री केंद्र व प्रसाधनगृह येथेच आहे. प्रेक्षक गॅलरीवर टेंसाईलचे छत राहणार असल्याने ते एखाद्या स्टेडियमसारखे दिसून येणार आहे. याशिवाय संगीत कारंज्यांची कंट्रोल टॉवर तसेच प्रोजेक्टरर रूमचे कामही सुरू आहे. प्रेक्षक गॅलरीच्या आतील भागात आकर्षक रोषणाई करण्यात येणार असून जमिनीवरील आय-ब्लॉक विविध प्रकारच्या डिझाईन बनविण्यात आले आहेत. आकर्षण रोषणाईने हे आय-ब्लॉक लक्षवेधक ठरणार आहेत. सोबतच बसण्यासाठी आसन व्यवस्थेसह लहान मुलांसाठी खेळणी, झुला व विविध कलाकृती (शिल्पकलेचे पुतळे) लागणार आहेत. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

११२ कोटींचा खर्च - 
संत्रानगरीच्या आकर्षणात भर घालणाऱ्या या प्रकल्पाची किंमत ११२.८९ कोटींचा खर्च येणार आहे. केंद्रिय रस्ते निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: futala lake area developing by mahametro in nagpur