esakal | अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर 
sakal

बोलून बातमी शोधा

why number of corona patients get reduced day by day in nagpur

परिणामी चाचणीलाच मर्यादा आल्याने कोरोनाचे निदान व त्यानंतर उपचार कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने नागरिकांत नैराश्य दिसून येत आहे.

अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर 

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : सध्या तरी कोरोनावर तत्काळ उपचार हाच उपाय आहे. मात्र, चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत कमी झाले आहे.

परिणामी चाचणीलाच मर्यादा आल्याने कोरोनाचे निदान व त्यानंतर उपचार कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने नागरिकांत नैराश्य दिसून येत आहे. लक्षणे असलेल्यांंनाही परत जावे लागत असल्याने कुटुंबीयांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांत चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने बाधितांची संख्याही कमी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा फिरण्याचा हुरूप येण्याची शक्यता आहे. मात्र, बाधितांची कमी दिसून येत असलेली संख्या फार्स असल्याचे चाचण्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत चाचण्याच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झाले. 

शुक्रवारी ५५९५, रविवारी ४३५५ तर काल, सोमवारी २७०१ चाचण्या झाल्या. या चाचण्या कमी झाल्याने बाधितांच्या संख्येतही घट झाली. आरटीपीसीआर तसेच ॲऩ्टिजिन, या दोन्ही चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. चाचण्यासाठी आवश्यक किटचा तुटवडा निर्माण झाल्याचे सुत्राने नमुद केले.

शहरात महापालिकेचे ५१ कोव्हीड चाचणी केंद्र आहेत. प्रत्येक प्रभागात एक चाचणी केंद्र असून सिव्हिल लाईन मनपा मुख्यालयाताही केंद्र आहे. या केंद्रावर डॉक्टरांकडून आरटीपीसीआर तसेच ॲन्टीजिन टेस्टसाठी नागरिकांचे नमुणे घेतले जाते. आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुणे घेण्यासाठी आवश्यक किटच्या साठ्यालाच ओहोटी लागल्याचे चित्र आहे. शहरात एका दिवसांत आठ ते दहा हजारांपर्यंत नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. 

परंतु आता किटचाच तुटवडा निर्माण झाला असून नव्या किट येईस्तोवर चाचण्यांच्या संख्येत घट दिसून येणार असल्याचे सुत्राने नमुद केले. त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांना चाचणीसाठी प्राधान्य देण्यात येत असले तरी अनेकांना चाचणी केंद्रावरून परत जावे लागत असल्याने त्यांच्यात कोरोनासंबंधी भीती वाढत आहेत. नागरिकांवर तत्काळ उपचारासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱी महापालिकाही पेचात पडली आहे.

या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद

चार दिवसांतील चाचण्या व बाधित

२५ सप्टेंबर - ५५९५ - ९७१
२६ सप्टेंबर - ५०२६ - १२०५
२७ सप्टेंबर - ४३५५ - ५९०
२८ सप्टेंबर - २७०१ - ८६२

संपादन - अथर्व महांकाळ