esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

future husband rapes a girl

महफूज दर आठवड्यात नागपुरात येऊन युवतीवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. लॉजवर न आल्यास लग्न तोडण्याची धमकी देत होता. नाईलाजास्तव युवती महफूजच्या सर्व मागण्या पूर्ण करीत होती. महफूजने सलग तीन महिने युवतीचे लैंगिक शोषण केले. 

साक्षगंध झाल्यानंतर भावी पतीच्या दबावात ठेऊ दिले 'तसे' संबंध; लग्नाची तारीख काढताना केली ही मागणी...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : उत्तर प्रदेशातील युवक महफूज... त्याचे नागपुरातील एका युवतीशी लग्न जुळले... जानेवारीमध्ये दोघांचे साक्षगंध झाले... दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर दोघांचा संपर्क सुरू झाला... दुसरीकडे दोन्ही कुटुंबीय लग्नाची तयारीत रमले... अशात महफूज होणाऱ्या पत्नीला भेटायला आला... युवतीनेही कुटुंबीयांची परवानी घेऊन होणाऱ्या पतीला भेटायला गेली... दोघेही एका लॉजवर गेले... तेथे गप्पा-गोष्टी केल्यानंतर पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन येथे 23 वर्षीय युवती राहते. तिचे जानेवारी 2020 मध्ये उत्तर प्रदेशातील युवक महफूज वहिउद्दीन खान (30, रा. परसोना, रामकोल्ला, उत्तरप्रदेश) याच्याशी लग्न जुळले. महफूजने नातेवाईकांसह नागपुरात येऊन जानेवारी महिन्यात युवतीशी साक्षगंध केले. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर दोघांचा संपर्क सुरू होता. त्याने लग्नापूर्वी युवतीला भेटण्याचा आग्रह धरला.

जाणून घ्या - आई... आई... माझी प्रकृती खूप खालावली गं; चालताही येई ना, मात्र...

युवतीने सुरुवातीला भेटण्यास नकार दिला. मात्र, महफूज आग्रह करीत असल्याने आई-वडिलांना परवानगी मागितली. पाच जानेवारी दोघांचे भेटण्याचे ठरले. ठरलेल्या तारखेला महफूज दुपारी नागपुरात आला. दोघांनी जयताळामधील एका ठिकाणी भेटण्याचा निर्णय घेतला. युवती त्याला भेटण्यासाठी खामल्यात पोहोचली. तेथून दोघेही एका लॉजवर गेले. तेथे गप्पा-गोष्टी केल्यानंतर महफूजने थेट शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. मात्र, युवतीने नकार दिला. 

यामुळे चिडलेल्या महफूूजने लग्न तोडण्याची धमकी दिली. काही दिवसांनी लग्न होणार असल्यामुळे युवतीने शारीरिक संबंधासाठी होकार दिला. लॉजवर महफूजने युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर महफूज दर आठवड्यात नागपुरात येऊन युवतीवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. लॉजवर न आल्यास लग्न तोडण्याची धमकी देत होता. नाईलाजास्तव युवती महफूजच्या सर्व मागण्या पूर्ण करीत होती. महफूजने सलग तीन महिने युवतीचे लैंगिक शोषण केले.

क्लिक करा - खासदार; आमदारांचेच सँम्पल चुकत असतील तर सामान्यांचे काय? त्यांचा उद्विग्न सवाल...

तीन लाखांची मागणी

मार्च महिन्यात लग्नाची तारीख काढायची असल्यामुळे युवतीच्या वडिलांनी महफूजशी संपर्क केला. त्याने लग्न करण्यापूर्वी तीन लाखांची मागणी केली. त्यामुळे युवतीने त्याची भेट घेतली. तिलाही पैसे न मिळाल्यास लग्न करणार नसल्याचे सांगत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच समाजात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची धमकी दिली. 

शेवटी पोलिसात गेले प्रकरण

युवतीने मार्च महिन्यापर्यंत महफूजशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने शेवटपर्यंत लग्नास नकार दिला. समाजता बदनामी होईल या भीतीने पोलिसात जाण्यासाठी नातेवाईक तयार नव्हते. शेवटी युवतीने पुढाकार घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

go to top