खबऱ्याने दिली ही माहिती अन् सात जण पोहोचले गजाआड...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पोलिसांनी सखन श्या मलाल भलावी (22, रा. कपिलनगर), रविकांत रामचंद्र चंद्रिकापुरे (60, रा. अंगुलीमालनगर), प्रणय पुरुषोत्तम बांबोडे (22, रा. बाबा दीपसिंगनगर), सचिन जनार्दन सांबळे (30, रा. कबीरनगर), राजू राधेश्यालम शाहू (52, रा. रमाईनगर), विकेश वीरेंद्र नागपूरकर (33, रा. कुंजीलाल परातेनगर) आणि धीरज पागुजी साखरे (40, रा. कडू ले-आउट, नारी) यांना पकडले. आरोपींच्या ताब्यातून रोख 19 हजार 740 रुपये आणि इतर साहित्य असा 26 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नागपूर  : कपिलनगरातील अंतर्गत पॉवरग्रिड चौकात सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने धाड घालून मटका खेळणाऱ्या सात जणांना अटक केली.
पॉवरग्रिड चौकात मटक्यााचा अड्डा सुरू असल्याची माहिती खबऱ्याने पोलिस पथकाला दिली होती. त्यावरून पोलिसांनी योजना आखून धाड घातली. त्या वेळी काही जण लोकांकडून पैसे घेऊन मटक्यापचे आकडे लिहून घेत खायवाडी करताना मिळून आले.

हाय दुर्बुद्धी  - ६५० रुपयांची लाच घेताना वनाधिकारी जाळ्यात

पोलिसांनी सखन श्या मलाल भलावी (22, रा. कपिलनगर), रविकांत रामचंद्र चंद्रिकापुरे (60, रा. अंगुलीमालनगर), प्रणय पुरुषोत्तम बांबोडे (22, रा. बाबा दीपसिंगनगर), सचिन जनार्दन सांबळे (30, रा. कबीरनगर), राजू राधेश्यालम शाहू (52, रा. रमाईनगर), विकेश वीरेंद्र नागपूरकर (33, रा. कुंजीलाल परातेनगर) आणि धीरज पागुजी साखरे (40, रा. कडू ले-आउट, नारी) यांना पकडले. आरोपींच्या ताब्यातून रोख 19 हजार 740 रुपये आणि इतर साहित्य असा 26 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कपिलनगर पोलिसांचा वरदहस्त

कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, उपनिरीक्षक अतुल इंगोले, सहायक उपनिरीक्षक सुभाष खेडकर, मनोजसिंह चौहान, प्रवीण फांदडे, प्रफुल्ल बोंद्रे, अमित मिश्रा यांनी केली. कपिलनगर पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी चंद्रीकापुरे आणि भलावी या दोघांसोबत अर्थपूर्ण संबंध ठेवलेले आहे. पोलिसांच्याच आशिर्वादामुळे मटका अड्‌डा सुरू होता. पोलिस कारवाई करीत नसल्यामुळे नागरिकांनी उपायुक्तांोकडेही तक्रारी केल्या होत्या. जर पोलिसच अवैध धंदेवाल्यांना सहकार्य करीत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नं निर्माण झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gajaad reached this information with seven more people ...