हाय दुर्बुद्‌धी ! तीन हजार 650 रुपयांची लाच घेताना वनाधिकारी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

सागवान झाडांच्या कटाईचा पंचनामा करण्यासाठी तीन हजार 650 रुपयांची मागणी केली होती. कार्यालयाबाहेरच एसीबीच्या पथकाने त्याला कॉन्ट्रॅक्‍टरकडून लाच घेताना पकडले.

काटोल (जि.नागपूर)  : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी काटोल वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली. त्याने सागवान झाडांच्या कटाईचा पंचनामा करण्यासाठी तीन हजार 650 रुपयांची मागणी केली होती. कार्यालयाबाहेरच एसीबीच्या पथकाने त्याला कॉन्ट्रॅक्‍टरकडून लाच घेताना पकडले.
 

पंचनामा करण्याचे मागीतले पैसे  
अटकेतील आरोपीचे नाव शरद रामराव सरोदे (वय 57) असे आहे. सरोदे काटोल वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात राऊंड ऑफिसर आहेत. तक्रारकर्ते कॉन्ट्रॅक्‍टर काटोल येथीलच रहिवासी आहेत. त्यांनी काटोल तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या बाभूळखेडामध्ये एका शेतकऱ्याशी सागवानाची झाडे कटाईचा करार केला होता. सागवानाची कटाई करण्यासाठी वन विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. वन विभागाच्या पंचनाम्यानंतरच झाडांची कटाई होऊ शकते. यामुळे तक्रारकर्त्यांनी काटोल येथील वन विभाग कार्यालयात अर्ज केला होता.

क्‍लिक करा  : मोठी बातमी गृहमंत्रयांच्या जिल्हयात घडली ही गंभीर घटना, तीन नराधमांनी विद्यार्थिनीला नेले झुडपात

राऊंड ऑफिसर सरोदे याने मोक्‍यावर जाऊन पडताळणी आणि पंचनामा करण्यासाठी तीन हजार 650 रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्यांनी प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली. योजनाबद्धरित्या तक्रारकर्ते आणि सरोदे यांच्यात बोलणे करण्यात आले. पडताळणीत कॉन्ट्रॅक्‍टरची तक्रार खरी असल्याचे समोर आले. बुधवारी सरोदे याने तक्रारकर्त्याला पैसे घेऊन आपल्या कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले. त्यांना सोबत घेऊन कार्यालयासमोरील चहाटपरीवर आला. येथे आधीच एसीबीच्या पथकाने सापळा रचून ठेवला होता. सरोदेने तक्रारकर्त्याकडून पैसे घेताच एसीबीच्या पथकाने त्याला पकडले. या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. सरोदे विरुद्ध काटोल ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या श्रेणीनुसार सर्वांना पैसे द्यावे लागतील. या हिशोबाने सरोदे याने तीन हजार 650 रुपये मागितले.

क्‍लिक करा  : एक काळ होता टी.चंद्रशेखर यांचा, आता आले टी.मुंडे

आणखी काहींचा सहभाग
यावरून स्पष्ट आहे की, काळ्या कमाईत आणखीही लोकांचा वाटा होता. एसीबी आता त्या लोकांबाबत विचारपूस करणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर आणि अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजीवनी थोरात, योगिता चाफले, नापोलिस शिपाई रविकांत डहाट, मंगेश कळंबे, रेखा यादव आणि राजेश बनसोड यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The forest officials were caught in a bribe of Rs