मुंढेंच्या बदलीनंतर शहरात वाढले कचऱ्यांचे ढीग 

राजेश रामपूरकर
Saturday, 17 October 2020

माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस आणि माजी महापौर नंदा जिचकार यांचा प्रभाग असलेल्या सरस्वती विहार, नेल्को सोसायटी, गजानन नगर परिसरात साफसफाई कर्मचारी येत नसल्याने नाल्याच्या शेजारी कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत. पूर्वी येथे कचरा संकलन करून तातडीने त्यावर प्रक्रिया करून येथील कचरा साफ केल्या जात होता. मात्र, गेल्या काही दिवसापासून या परिसरातून कचरा साफ करणारे कर्मचारी गायब झाल्याने या परिसराला डंम्पीग यार्डचे स्वरूप आलेले आहे.

नागपूर :  स्वच्छतेच्या मानांकनात नागपूर शहराने आघाडी घेतली आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मिळालेला हा मान पुन्हा धुळीस मिळण्याची शक्यता आहे. काही भागातील नागरिक कचरा थेट रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत. परिणामी, शहर विद्रूप होऊ लागले आहे. 

माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस आणि माजी महापौर नंदा जिचकार यांचा प्रभाग असलेल्या सरस्वती विहार, नेल्को सोसायटी, गजानन नगर परिसरात साफसफाई कर्मचारी येत नसल्याने नाल्याच्या शेजारी कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत. पूर्वी येथे कचरा संकलन करून तातडीने त्यावर प्रक्रिया करून येथील कचरा साफ केल्या जात होता. मात्र, गेल्या काही दिवसापासून या परिसरातून कचरा साफ करणारे कर्मचारी गायब झाल्याने या परिसराला डंम्पीग यार्डचे स्वरूप आलेले आहे.५०

आरायंत्राला दिलेली परवानगी चुकीचीच 

तसेच, आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या भागातून ये-जा करताना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हा कचरा कुजून आजूबाजूच्या परिसरात याची दुर्गंधी पसरत असते. परिणामी, आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यावर 'ज्या ज्या ठिकाणी कचरा रस्त्यावर कचरा टाकला जात आहे, अशा ठिकाणी लक्ष देऊन दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कचरा भटक्या श्वानांमार्फत रस्त्यावर पसरत असल्याने शहराच्या ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण तयार होत असते. यामुळे शहराचेही विद्रुपीकरण होऊ लागले आहे यासाठी जे अशा प्रकारे कचरा रस्त्यावर टाकून शहराला बकाल करीत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 

मुंढेंच्या बदलीनंतर शहर बदलले 

माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील यंत्रणेवर चांगलाच वचक होता. त्यामुळे कोरोनाच्या काळातही सफाई कर्मचारी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत असल्याने शहरातील साफसफाई होत होती, कचऱ्यांचे ढीग गायब झाले होते. राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची बदली होताच शहरातील अनेक भागात कचऱ्यांचे ढीग दिसू लागले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage Dump in City