लसुण तिनसो के पार...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

पंधरा दिवसांपूर्वी कांद्याने डोळ्यांत पाणी आणले होते. कांदा दरामध्ये आता घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु लसणाचे दर आता वाढू लागले असून त्यामुळे स्वयंपाकघरातील फोडणीही महागली आहे. मेथी, पालक, कोथिंबीर आदी भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुले त्यांचे दर आवाक्‍यात आले असले, तरी या स्वस्ताईवर लसणाचे दर चढे आहेत.

नागपूर : कांद्याच्या दरात घसरण होत असताना आता लसणाच्या दराचा आलेख चढू लागला आहे. त्यामुळे लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर चालला आहे. फोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्या पलीकडे गेले आहे. ठोक बाजारात प्रतिकिलो 200 ते 210 रुपये दर आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी कांद्याने डोळ्यांत पाणी आणले होते. कांदा दरामध्ये आता घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु लसणाचे दर आता वाढू लागले असून त्यामुळे स्वयंपाकघरातील फोडणीही महागली आहे. मेथी, पालक, कोथिंबीर आदी भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुले त्यांचे दर आवाक्‍यात आले असले, तरी या स्वस्ताईवर लसणाचे दर चढे आहेत.

अतिवृष्टीचा फटका बसल्याने कांदा, लसूण आणि आल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर किरकोळ बाजारात 60 रुपये किलोंवर पोहोचला आहे. कांद्याच्या दरांमध्ये घसरण होऊ लागली आहे. मात्र, लसणाचीही दरवाढ कायम दिसून येत आहे. किरकोळ बाजारात लसूण प्रतिकिलो 280 रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांचे बजेट बिघडले आहे.

सविस्तर वाचा - महापौर संदीप जोशींसह वीस जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

हिवाळ्यात लसणाला चांगली मागणी दिसून येते. जेवणात दोन्ही घटकांचा नियमितपणे उपयोग होतो. विशेषत: मसाल्याच्या भाज्यांमध्ये लसणाचा अधिक उपयोग होतो. हिवाळ्यात वाढणारा मांसाहार यामुळेही कांदा व लसणाची मागणी दिसून येत असताना वाढलेले दर ग्राहकांचा हिरमोड करणारे ठरत आहेत.

आवक घटली, उत्पादनालाही फटका
कांदा, लसणाला अतिवृष्टीचा फटका बसला असून मोठे नुकसान झाले आहे. परिणामी त्यांचे उत्पादनही कमी आले आहे. बाजारपेठांतील आवक घटल्याने लसणाचे दर वधारले आहेत. कांद्यानंतर आता लसणाची दरवाढ होत असून सर्वसामान्यांच्या खिशाला ती परवडेनाशी झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garlic is now 300 rs. per KG

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: