या कन्येने वाढविला महाराष्ट्राचा मान, शिरपेचात रोवला मानाचा तुरा .... वाचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

क्षणात विध्वंस करून परकीय शत्रूला थरकाप सोडणारी लढाऊ विमाने देशाच्या सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. "सर्जिकल स्ट्राइक'च्या वेळीही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. मात्र, महिलांना फायटर पायलट होता येत नव्हते. त्यामुळे न्यायालयीन लढाई जिंकून 2016 साली अवनी चतुर्वेदी हिने देशातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा मान मिळवला. हेच स्वप्न उराशी बाळगून नागपूरच्या अंतरा मेहता हिने फायटर पायलट होण्यासाठी परिश्रम घेतले. मूळची बास्केटबॉल खेळाडू असलेल्या अंतराने त्यासाठी 2018 मध्ये रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

नागपूर  : "मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है' या ओळींना सार्थ ठरवत नागपूरच्या फ्लाइंग ऑफिसर अंतरा रवी मेहता हिने राज्यातील पहिली आणि देशातील दहावी महिला फायटर पायलट होण्याचा मान पटकाविला आहे. शनिवारी (ता. 20) भारतीय वासुसेनेची पासिंग आऊट परेड झाली. तिच्या गगनभरारीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

क्षणात विध्वंस करून परकीय शत्रूला थरकाप सोडणारी लढाऊ विमाने देशाच्या सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. "सर्जिकल स्ट्राइक'च्या वेळीही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. मात्र, महिलांना फायटर पायलट होता येत नव्हते. त्यामुळे न्यायालयीन लढाई जिंकून 2016 साली अवनी चतुर्वेदी हिने देशातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा मान मिळवला. हेच स्वप्न उराशी बाळगून नागपूरच्या अंतरा मेहता हिने फायटर पायलट होण्यासाठी परिश्रम घेतले. मूळची बास्केटबॉल खेळाडू असलेल्या अंतराने त्यासाठी 2018 मध्ये रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

मॅरेज ऍनिव्हर्सरीला वैयक्तिक आनंदाचा त्याग, वाचा खऱ्या कोव्हिड योद्‌ध्याची कथा 

यानंतर तिने हैदराबाद येथील डुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीत प्रवेश घेतला. जवळपास वर्षभर प्रशिक्षण घेतल्यावर अंतराने "पिलेटस पीसी-7' हे विमान यशस्वीरित्या उडविले. यानंतर दुसऱ्या टप्प्यात तिने "किरण एमके-1' हे लढाऊ विमान यशस्वीरित्या उडवले. आज पार पडलेल्या पासिंग आउट परेडमध्ये तिच्यासह 123 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. आता यानंतर तिला बिदर आणि कलाईकोंडा येथे "हॉक्‍स' या फायटर प्लेनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंतराचे वडील रवी मेहता एका सिमेंट कंपनीमध्ये कामात असून, आई पाळणाघर चालविते. घरात लहान असलेल्या अंतराची मोठी बहीण दीपशिखा ही खासगी शिकवणी वर्गात कॉम्प्युटर सायन्स हा विषय शिकविते. अंतराच्या स्वप्नपूर्तीत वडील रवी यांचे परिश्रम आणि बहीण दीपशिखा यांचे मोठे योगदान आहे.

आपल्या मनाचे ऐका: अंतरा
कुठलेही काम करताना ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचे ऐका. जगात काहीही अशक्‍य नाही. आत्मविश्‍वास महत्त्वाचा असल्याचे अंतरा मेहता हिने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. आज देशातील दहावी महिला फायटर पायलट झाल्याचा मनातून आनंद आहे. मात्र, तो आनंद मिळविण्यासाठी मनात जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी केली. मुलीही मुलांप्रमाणे फायटर पायलट होऊ शकतात हे सिद्ध केले. यासाठी घरच्यांनीही मदत केली. सुरुवातीला शक्‍य होईल का असे वाटले; मात्र प्रशिक्षणामुळे आत्मविश्‍वास वाढल्याचे अंतरा म्हणाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This girl has increased the honor of Maharashtra, the crown of honor in the crown .... read