
बेला पोलिस स्टेशनचे प्रभारी साहायक पोलिस निरीक्षक यांनी शासकीय वाहन उपलब्धतेअभावी तपासात दिरंगाई केली, असा आरोप आहे.
बुटीबोरी (जि. नागपूर) : पत्नी सोडून गेल्याच्या विरहात विकृत झालेल्या पित्याने पोटच्या सात वर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या केल्याची घटना धवळपेठ शिवारात उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, समाजमन सुन्न झाले आहे. बिजली गजानन काळे (वय ७) असे मृत चिमुकलीचे तर गजानन काळे (२७, रा. धवळपेठ, ता. नागपूर) असे आरोपी पित्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती गजानन हा पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे पती-पत्नीत नेहमीच वाद व्हायचा. या वादातून दोन महिन्यांपूर्वी पत्नी ज्योती मुलगी बिजलीला घेऊन माहेरी वडिलांकडे राहायला गेली. आरोपी गजानन हा पत्नी व मुलीला घरी आणण्यासाठी सासुरवाडीला अनेकदा गेला. परंतु, सासरे सूर्यभान काकडे हे मुलीला पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे गजानन हा पत्नी विरहातच राहायचा.
दुचाकीवर आलेल्या चौघांनी मुलांना नेले पडक्या विहिरीकडे तर मुलींना दूर नेत केले अश्लील चाळे
२२ फेब्रुवारीला बेला येथील गुरुमाऊली आर्शमात नात्यातील लग्न असल्याने काकडे व काळे परिवार या लग्नात आले. दुपारी दोन वाजता लग्न आटोपल्यानंतर मुलीची आई ज्योती व नातेवाईक चिमुकली बिजली दिसत नसल्याने शोध घेत होते. मुलीचे आजोबा मोहन काळे यांनी मुलीला तिचे वडील गजानन हा घेऊन गेल्याचे सांगितले. मात्र, सायंकाळ होऊनही ते विवाहस्थळी न पोहोचल्याने मुलीची आई व नातेवाईकांनी बेला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
बेला पोलिस स्टेशनचे प्रभारी साहायक पोलिस निरीक्षक यांनी शासकीय वाहन उपलब्धतेअभावी तपासात दिरंगाई केली, असा आरोप आहे. रात्री साडेतीन वाजता धवळपेठ परिसरात मुगली मृतावस्थेत आढळली. बेला पोलिसांनी मुलीचे वडील गजानन काळे व आजोबाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.
अधिक माहितीसाठी - ...तर २६ फेब्रुवारीपासून किमान दहा दिवसांचा लॉकडाऊन
... तर चिमुकलीचा जीव वाचला असता
मुलगी बेपत्ता व अपहरणाची तक्रार बेला पोलिस स्टेशनला सायंकाळी सहा वाजता करूनही पोलिसांनी तपासात दिरंगाई केली. पोलिसांनी तपास यंत्रणा तत्काळ कामाला लावली असती तर चिमुकलीचा जीव वाचला असता.
- संजय चिकटे,
उपसभापती, नागपूर पंचायत समिती