‘सूपर स्प्रेडर्स’ ना द्या डोज; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात तरुणाई ‘फ्रंट वॉरियर’

give Super Spreaders a dose Youth Font Warrior in the fight against Corona
give Super Spreaders a dose Youth Font Warrior in the fight against Corona
Updated on

नागपूर : कोरोना महामारीविरुध्दच्या युध्दात तरुणाई सैनिकांप्रमाणेच आघाडीवर जाऊन लढा देत आहे. कधी कोरोनाबाबत जनजागृती तर कधी एखाद्याला ॲम्बुलन्स, खाटा मिळवून देण्यासाठी धडपडणारे शहरातील अनेक तरुण वयोगटाच्या बंधनामुळे लसीकरणापासून वंचित आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना हिच तरुणाई समाजाच्या विविध घटकांच्या संपर्कात येत असल्याने ती विषाणुंची वाहकही झाली आहे. त्यामुळे ही महामारी रोखण्यासाठी तरुण-तरुणींचे लसीकरण करण्याची आवश्यकता आहे.

लसीकरण झाल्यास तरुणाई कोरोनाच्या लढ्यात आणखी जोमाने काम करण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या केवळ ४५ वर्षे झालेल्यांना लस देण्यात येत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही मोठ्या प्रमाणात २५ ते ३५ वयोगटातील तरुण सहभागी आहेत. एकीकडे आरोग्य सेवक किंवा फ्रंटलाईन कर्मचारी जी कामे करीत आहेत, तीच कामे अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने करीत आहेत. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्यातही आता भीतीचे वातावरण आहे.

त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तरुणांचे लसीकरण आवश्यक झाल्याचे मत नागपूर सिटीझन फोरमचे अमित बांदुरकर यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तरुणांना लसीकरणाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यामुळे शहरात तरुणाईत लसीकरणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

लोकसंख्येच्या दहा टक्के लसीकरण

२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २४ लाखांवर होती. दरवर्षी एकूण लोकसंख्येच्या दीड टक्क्यांनी लोकसंख्या वाढत असते. त्यानुसार गेल्या नऊ वर्षात साडेतीन लाखांवर लोकसंख्या वाढली असून आता ती २८ लाखांच्या घरात आहे. आतापर्यंत (५ एप्रिलपर्यंत) २ लाख ८५ हजार ९०२ नागरिकांनी लसीकरण केले. ही संख्या लोकसंख्येच्या एकूण दहा टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com