खुश खबर.. खुश खबर... गहु झाला स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

अवेळी आलेल्या पावसामुळे यंदा गव्हाची लागवड उशिराने झाली. त्याचा फटका गव्हाच्या उत्पादनाला बसण्याची शक्‍यता आहे. ती शक्‍यता लक्षात घेता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गव्हाच्या दरात प्रतिकिलो एक ते दीड रुपयाची वाढ झाली होती. त्यामुळे कणकेचे भावही वाढल्याने ग्राहक हवालदिल झाला होता.

नागपूर : साठवणूकदारांनी गोडाऊनमधील गहू मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आणल्याने गेल्या आठ दिवसांत गव्हाच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयाची घसरण झाली आहे. नवीन गहू मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्‍यता आहे.

ब्रेकिंग - पती-पत्नीने घेतले विष आणि...

अवेळी आलेल्या पावसामुळे यंदा गव्हाची लागवड उशिराने झाली. त्याचा फटका गव्हाच्या उत्पादनाला बसण्याची शक्‍यता आहे. ती शक्‍यता लक्षात घेता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गव्हाच्या दरात प्रतिकिलो एक ते दीड रुपयाची वाढ झाली होती. त्यामुळे कणकेचे भावही वाढल्याने ग्राहक हवालदिल झाला होता. मात्र, साठेबाजांनी नवीन गहू दोन महिन्यांत बाजारात येणार असल्याने साठवणूक केलेल्या गहू बाजारात मोठ्या प्रमाणात आणला. त्यामुळे गव्हाच्या दरात घसरण झाल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मार्चनंतर वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीला वेग येतो. सध्या जेवढा हवा तेवढाच गहू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असल्याने मागणीही कमी आहे. मागणी कमी आणि आवक वाढल्याने ही घसरण झालेली आहे.

विदर्भात मध्य प्रदेशातून सर्वाधिक गव्हाची आवक होते. त्या परिसरात डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्याने गव्हाच्या पिकांचे नुकसान होईल असा अंदाज होता. मात्र, त्याचा फटका गव्हाला बसला नाही. तसेच थंडीही पडल्याने गव्हाचे उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यताही जाणकारांनी व्यक्त केलेली आहे. सध्या साधारण गहू प्रतिक्विंटल 2400-2600 रुपये तर एमबी बोट गहू 2800 ते 3000 रुपयापर्यंत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी हेच दर 2950 ते 3200 रुपयांवर होते, असे धान्य व्यापारी प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news .. Good news ... Wheat is cheap