‘ड्रेस कोड’चा फज्जा; कर्मचाऱ्यांच्या पायात स्लिपर, गळ्यात नाही ओळखपत्र

Government order trampled by employees
Government order trampled by employees

नागपूर : शासकीय पुरुष व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील पेहरावासंदर्भात राज्य सरकारने नवी नियम निश्चित केले आहेत. परंतु, याचे कोणत्याही प्रकारचे पालन होत नाही. अनेक कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र नसून अनेक जण तर पायात स्लिपर चप्पल घालून आले होते.

कित्येक कर्मचारी तर चक्क जीन्स पॅंट घालून होते. शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यासाठी सर्व जणू उतावीळ असल्याचे चित्र सर्वत्र होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने एक प्रकारे पायमल्लीसाठी त्यांच्याकडून प्रोत्साहनच देण्यात येत असल्याची टीका होत आहे.

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून आठ डिसेंबरला आदेश, काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. यानुसार महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात साडी, सलवार, चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅंट व त्यावर कुर्ता, अथवा शर्ट तसेच आवश्यक असल्यास दुपट्टा तर पुरुष कर्मचाऱ्यांसाठी शर्ट, पॅंट, ट्राऊझर पॅंट असा पेहराव निश्चित करण्यात आला.

जीन्स व टी शर्टच्या वापरावर बंदी घालण्यात आली. चप्पल, बुट, सॅंडल यांचाच वापर करण्यास सांगण्यात आले. परंतु, अनेक शासकीय कार्यालयात या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्रच नव्हते. काही कर्मचाऱ्यांच्या पायात स्लिपर चप्पल होती. शासनाच्या आदेशाचे पालन होणे आवश्यक होते. परंतु, याकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष देण्यात आले नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com