esakal | 'यशवंत स्टेडियमचा चेहरा मोहरा बदलणार; म्युझियम, गेस्ट हाऊस आणि पार्किंगचा समावेश': पालकमंत्र्यांची माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

yashwant stadium

शहरातील नामांकित यशवंत स्टेडीयमच्या अद्ययावतीकरणाबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली.

'यशवंत स्टेडियमचा चेहरा मोहरा बदलणार; म्युझियम, गेस्ट हाऊस आणि पार्किंगचा समावेश': पालकमंत्र्यांची माहिती 

sakal_logo
By
निलेश डोये

नागपूर : यशवंत स्टेडीयम अद्ययावत करून २० हजार प्रेक्षक क्षमतेचे तयार करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, व्यापारी संकुल, म्युझियम व गेस्ट हाऊस व पार्किंगचा समावेश राहणार आहे. या अद्ययावतीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले.

शहरातील नामांकित यशवंत स्टेडीयमच्या अद्ययावतीकरणाबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. आमदार अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व नागपूर सुधार प्रन्यास व महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बाधित वृद्धाचे आत्महत्या प्रकरण : २० तासांपासून रुग्ण खाटेवर नसतानाही केस पेपरवर सुरू...

यशवंत स्टेडीयमच्या नूतनीकरणाच्या आराखड्याची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, व्यापारी संकुल, म्युझियम, अभ्यास केंद्र, मेमोरिअल हॉल, गेस्ट रूम, वाहनांसाठी पार्किंग आदी चार लाख स्क्वेअर मीटर क्षेत्रात हे बांधकाम करण्यात येणार आहे. यशवंत स्टेडीयम शहराच्या मध्यभागी असून ही जागा शासकीय आहे.

 या जागेवर महानगर पालिकेचा ताबा आहे. अद्ययावतीकरणासाठीचा प्रस्ताव मेट्रोकडे देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. मुख्यमंत्री यांना सादरीकरण दाखवून निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

उपराजधानीत लसीकरण जोमात! नवीन ५१ लसीकरण केंद्र लवकरच होणार सुरु; जाणून घ्या यादी 

ताजबाग दर्गा समितीच्या स्थापनेसाठी बैठक

ताजबाग दर्गा समितीच्या स्थापनेसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ही समिती राज्य शासनाच्या आधिपत्याखाली असून समितीवर जिल्हा न्यायाधीश नियुक्त केले जातात. समिती स्थापनेसाठी विधी व न्याय सचिवांशी बैठक घेऊन येणाऱ्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ