esakal | बाधित वृद्धाचे आत्महत्या प्रकरण : २० तासांपासून रुग्ण खाटेवर नसतानाही केस पेपरवर सुरू होता औषधोपचार
sakal

बोलून बातमी शोधा

records on the case paper of the missing corona patient

खाटेवरून हा रुग्ण बेपत्ता झाल्यानंतरही त्याच्या केस पेपरवर रुग्णाला तपासण्यात आल्याची व रेमडिसेवीर दिल्याची नोंद करण्यात येत होती. हे याच वॉर्डात दाखल असलेल्या एका रुग्णाने बाहेर नातेवाइकांना सांगितल्यानंतर मेडिकलच्या कोविड वॉर्डातून बाहेर आलेल्या चर्चेला उधाण आले आहे.

बाधित वृद्धाचे आत्महत्या प्रकरण : २० तासांपासून रुग्ण खाटेवर नसतानाही केस पेपरवर सुरू होता औषधोपचार

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने मेडिकलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणातील सत्य लपवण्यात येत असल्याची चर्चा मेडिकलमध्ये सुरू झाली आहे. २४ तासांपूर्वी आत्महत्या झाल्यानंतरही या प्रकरणाची माहिती रुग्णालयाला नव्हती. विशेष असे की, हा वृद्ध २० तासांपासून खाटेवर दिसत नसूनही त्याच्या केस पेपरवर औषधोपचार करण्यात येत असल्याची चर्चा कोविड हॉस्पिटलमधील तळघरातील रुग्णांमध्ये रंगली होती. नातेवाइकांच्या माध्यमातून या चर्चेला मेडिकल वर्तुळात उधाण आले आहे.

मेडिकलमधील तळघरातील कोरोना वॉर्डात दाखल असलेल्या पुरुषोत्तम आप्पाजी गजभिये या ८१ वर्षीय व्यक्तीने निराशेतून हे टोकाचे पाऊल उचलले. मेडिकलमध्ये कोविड वॉर्डात आत्महत्या झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात आली. चौकशी समितीकडून काही साक्ष नोंदवण्यात आल्या. या नोंदीतून काही सत्य उघड झाले असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला असल्याची तक्रार एका रुग्णाच्या नातेवाइकाने बोलून दाखवली आहे.

अधिक वाचा - कुख्यात गुंड रणजित सफेलकरवर माजी मंत्र्यांचा वरदहस्त, पाच-पन्नास रुपायांची सवारी मारणारा ऑटोचालक झाला कोट्यधीश

खाटेवरून हा रुग्ण बेपत्ता झाल्यानंतरही त्याच्या केस पेपरवर रुग्णाला तपासण्यात आल्याची व रेमडिसेवीर दिल्याची नोंद करण्यात येत होती. हे याच वॉर्डात दाखल असलेल्या एका रुग्णाने बाहेर नातेवाइकांना सांगितल्यानंतर मेडिकलच्या कोविड वॉर्डातून बाहेर आलेल्या चर्चेला उधाण आले आहे.

धुळवडीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास बाथरूममध्ये एका सफाईगार व परिचारिकेच्या लक्षात आले. हाताला लागलेली ऑक्सिजन (सलाईनच्या नळ्या) नळी गळ्याभोवती गुंडाळली होती, यानंतर ती एक्झिट फॅनला लावून आत्महत्या केली होती. यासंदर्भात मेडिकलमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता साऱ्यांनी चुप्पी साधली.