आरटीई प्रवेशाकडे सरकारचे दुर्लक्ष, ही आहेत कारणे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर प्रक्रियेतील सोडत 17 मार्चला काढण्यात आली. आरटीई प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 920 पाल्यांची निवड करण्यात आली आहे. 75 हजार 465 पाल्य प्रतीक्षा यादीत आहेत. नागपूरमधून 6 हजार 784 जागांसाठी 31 हजार 44 पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 6 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 17 मार्चला सोडत निघाल्यावर 21 मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.

नागपूर : शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्‍लासेस घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू करण्यावर मंथन होत असताना, आरटीई प्रवेशाबाबत सरकारचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहण्यास आरटीईमधील विद्यार्थी वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर प्रक्रियेतील सोडत 17 मार्चला काढण्यात आली. आरटीई प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 920 पाल्यांची निवड करण्यात आली आहे. 75 हजार 465 पाल्य प्रतीक्षा यादीत आहेत. नागपूरमधून 6 हजार 784 जागांसाठी 31 हजार 44 पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 6 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 17 मार्चला सोडत निघाल्यावर 21 मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.

याउलट सरकारकडून राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्रात 15 जून तर विदर्भात 26 जूनपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यावर बरेच मंथन करण्यात येत आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यापासूनच आरटीईच्या प्रवेशाची फेरी सुरू होऊन जात असल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापर्यंत बहुतांश प्रवेश होऊन जायचे. मात्र, राज्यात टाळेबंदी लागल्यामुळे या प्रवेशाकडे शिक्षण विभागाचे लक्षच नसल्याचे दिसते. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शाळांकडूनही प्रताडना

दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत पालकांना संदेश पाठवून 20 मेपर्यंत प्रवेशाचा हप्ता भरण्याची सूचना केली आहे. या प्रकाराने नेमका कुठे प्रवेश घ्यायचा हा प्रश्‍न आहे. त्यामुळे पालकांसमोर दुहेरी पेच पडला आहे. तेव्हा आरटीई प्रक्रियेबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.

अवश्य वाचा- ...अन्‌ कुटुंबीय म्हणाले तुम्हीच करा अंत्यसंस्कार; फक्‍त येताना अस्थी घेऊन या

  • राज्यातील जागा - 1,00,920
  • प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी संख्या - 75,465
  • शहरातील जागा - 6,784
  • आलेले अर्ज - 31,044
  • निवड झालेले विद्यार्थी - 6,685

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government's disregard for RTE admissions