पदवीधर निवडणूक : अनिल सोले की संदीप जोशी?, भाजपात एकच चर्चा 

राजेश चरपे  
Thursday, 29 October 2020

पद्‍वीधर मतराद संघाचे आमदार अनिल सोले यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. ते दोन वेळा या मतदारसंघातून निवडूण आले आहेत. त्यामुळे आता नव्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी भाजपचे युवा कार्यकर्ते करीत आहेत.

नागपूर  ः पद्‍धीवर मतदार संघाचा उमेदवार कोण? आमदार अनिल सोले की महापौर संदीप जोशी अशी एकच चर्चा सध्या भाजपात आहे. दोघांचेही समर्थक भाऊंना उमेदवारी पक्की असल्याचे ठामपणे सांगत आहेत. भाजपनेही अद्याप अधिकृत घोषणा केली नसल्याचे संभ्रम निर्माण झाला आहे.

पद्‍वीधर मतराद संघाचे आमदार अनिल सोले यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. ते दोन वेळा या मतदारसंघातून निवडूण आले आहेत. त्यामुळे आता नव्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी भाजपचे युवा कार्यकर्ते करीत आहेत. दुसरीकडे महापौर संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे. त्यांना पक्षाने संकेत दिल्यानंतरच त्यांनी घोषणा केल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.

करोनामुळे पदवीधरची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. सध्या भाजपसह, काँग्रेस व काही अपक्ष उमेदवार कामाला लागले आहेत. मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली जात आहे. काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांची उमेदवारी निश्चित मानल्या जात आहे. अनिल सोले यांनी आपली चमू कामाला लावली आहे. दौरेही सुरू केले आहेत. त्यांचा प्रत्यक्ष गाठीभेटींवर जोर आहे.

अधिक माहितीसाठी - एक लक्षात ठेवा! राष्ट्रवादी आता राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष; शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी दिला इशारा
 

दुसरीकडे युवा मोर्चाने अलीकडे अनेक चौकांमध्ये पोस्टर लावणे सुरू केले आहे. मतदार नोंदणी करा आणि भाजपच्या उमेदवाराला निवडूण आणा असे आवाहन केल्या जात आहे. युवा मोर्चा यापूर्वी पदवीधरमध्ये फारसा सक्रिय दिसत नव्हता. त्यामुळे युवा नेत्याला प्रमोट करण्यासाठी मोर्चा कामाला लागल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे संदीप जोशी यापूर्वीसुद्धा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. उमेदवार जाहीर होण्यापूर्वी त्यांच्याचकडे मतदार नोंदणीची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर सोपवली होती. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची ही जागा असल्याने पक्षाने उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांना सोपवले होते. मात्र आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही मत यावेळी उमेदवार निवडताना महत्त्वाचे राहणार आहे. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduate Election Anil Sole or Sandeep Joshi