(Video) गुमगाववासीयांना आजही पावसाळ्यात सहन कराव्या लागतात या वेदना...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

शहरी भागाचा विकास झाला असला तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अद्याप पाहिजे तेवढी सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसांत तर अनेक गावांचा मार्ग बंद होतो.

गुमगाव (जि. नागपूर) : गुमगावच्या वेणा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला 39 वर्षे झाल्याने मोडकळीस आला होता. गेल्या दीड वर्षापूर्वी येथील पूल जमीनदोस्त करण्यात आला. पुलाच्या बाजूलाच असलेल्या वेणा नदीच्या पात्रातून रहदारीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, पावसाळ्यात पर्यायी रस्त्यावरून वेणा नदीचे वाहते पाणी आणि आजूबाजूच्या चिखलामुळे हा मार्ग दिवसेंदिवस गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे सारे ऋतू परवडले परंतु, पावसाळा जीवात धडकीच भरवतो, असे ग्रामस्थ बोलून जातात.

सुमारे 41 वर्षांपूर्वी 4 ऑगस्ट 1979 रोजी गावाला वेणा नदीला आलेल्या महापुराचा दणका बसला. महापुरानंतर वेणा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु आता जुना पूल मोडकळीस आल्यानंतर नवीन पुलाच्या बांधकामासाठी दीड वर्षापूर्वी पूल पाडण्यात आला. शिवाय रहदारीसाठी पुलाच्या बाजूलाच नदी पात्रातून नवीन पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला. तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेला हा रस्ता आता बिकट होत आहे. कामगार, दुग्धव्यावसायिक, दुचाकीसह चारचाकी वाहनांची गैरसोय होते. नाइलाजास्तव वाहनचालकांना दूरच्या मार्गाचा पर्याय सध्या निवडावा लागतो.

ती रडत रडत म्हणाली, तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझे अश्‍लील व्हिडिओ नको काढू

शहरी भागाचा विकास झाला असला तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अद्याप पाहिजे तेवढी सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसांत तर अनेक गावांचा मार्ग बंद होतो. त्यामुळे पूर ओसरतपर्यंत नागरिकांना वाट बघावी लागते. विद्यार्थी तसेच दररोजच्या कामासाठी शहरात जाणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

वेणा नदीला पूर आल्यानंतर प्रवाशांना दोन्ही बाजूंनी ताटकळत बसून, पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. रस्त्यावरून नदीचे पाणी वाहत असताना काही दुचाकी वाहनचालक जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पुलाचे काम वेगाने झाले असते तर ही वेळ आली नसती, अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gumgaon residents still have to endure pain in the rainy season

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: