ती रडत रडत म्हणाली, 'तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझा अश्‍लील व्हिडिओ नको काढू...'

अनिल कांबळे
मंगळवार, 30 जून 2020

रंजनने तिला राजगृहनगरात राहत असलेल्या मित्राच्या घरी नेले. तिथे रोहित आणि जान्हवी हे दोघे बसलेले होते. रंजनने सविताशी अश्‍लील चाळे करीत कपडे फाडले. यानंतर रोहितने तिला शारीरिक संबंध ठेऊ देण्याची मागणी केली. मात्र, सविताने नकार दिला. यानंतर रंजनने तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

नागपूर : सविता सतरा वर्षांची. धरमपेठच्या नामांकित कॉलेजमध्ये शिकते. ती अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिची वस्तीत राहणारा रंजन नावाच्या युवकाशी ओळख झाली. ओळखीची रूपांतर मैत्रीत झाले अन्‌ मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. फेसबुकवरून दोघेही संपर्कात आले होते. दरम्यान, मोबाईल क्रमांक घेतल्याने त्यांचे प्रेम फुलले होते. दोघांच्या भेटीगाठी झाल्या. दरम्यान, दोघांनी अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंध ठेवणे सवितासाठी धोक्‍याचे ठरले. रंजनने मोबाईलद्वारे शारीरिक संबंधाचे व्हिडिओ आणि फोटो काढले अन्‌ सुरू झाला पुढील प्रकार... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सविता ही शिकवणी वर्गाला जात होती. ती दुपारी सीआरपीएफ गेटजवळील पेट्रोलपंपजवळ बसमधून उतरली. यावेळी रंजन तिच्या मागेमागे पोहोचला. त्याने सविताला आवाज देऊन थांबवले आणि दुचाकीवर बसण्यास सांगितले. मात्र, तिने सोबत येण्यास नकार दिला. त्याने बळजबरीने सविताला सोबत चलण्यास सांगितले. तरीही तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या रंजनने तिला मोबाईलमध्ये काढलेल्या तिच्या ब्ल्यू फिल्म्स आणि फोटो दाखवले. सोबत न आल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे सविता रंजनच्या दुचाकीवर बसून गेली.

हेही वाचा - पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगड ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...

रंजनने तिला राजगृहनगरात राहत असलेल्या मित्राच्या घरी नेले. तिथे रोहित आणि जान्हवी हे दोघे बसलेले होते. रंजनने सविताशी अश्‍लील चाळे करीत कपडे फाडले. यानंतर रोहितने तिला शारीरिक संबंध ठेऊ देण्याची मागणी केली. मात्र, सविताने नकार दिला. यानंतर रंजनने तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सविता घाबरली असताना रोहितने बलात्कार केला. बलात्कार सुरू असताना रंजन आणि जान्हवी या दोघांनी अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो काढले. तसेच या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर रंजनने तिला बाईकवर बसवून घरी सोडून दिले. 

मुलीने आजीला सांगितला प्रकार

अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन रंजन आणि रोहित सविताला नेहमी वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करू लागले. नाईलाजाने तिही शारीरिक संबंध ठेऊ देत होती. मात्र, दोघांची शारीरिक संबंधासाठी मागणी वाढतच असल्याने ती कंटाळून गेली होती. त्रस्त झाल्याने तिने हा प्रकार आजीला सांगितला. आजीने तिला घेऊन एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

अधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार

अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

वस्तीत राहणाऱ्या मित्राने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर व्हिडिओ व फोटो काढले. हेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंध प्रस्थापित करायचा. यानंतर त्याने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या मित्रालाही बोलावले. दोघांनीही आळीपाळीने बलात्कार केला. तसेच एका मैत्रिणीने त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. यावेळी सविता "तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझ्या बलात्कारचे व्हिडिओ नोको करू' अशी म्हणून विनवणी करू लागली. मात्र, तिने व्हिडिओ तयार केले. तसेच कुणाला काहीही सांगितले अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven year old girl abducted