निम्म्या नागपूर शहराचे पाणी आज  बंद, कारण काय?

Half of Nagpur city has no water supply today
Half of Nagpur city has no water supply today

नागपूर  ः अमृत योजनेंतर्गत झोपडपट्ट्यांमध्ये जलवाहिनीचे जाळे पसरविण्यात येत आहे. त्यासाठी २४ फेब्रुवारीला मुख्य जलवाहिनीवर आंतरजोडणीची कामे करण्यात येणार आहे. २४ तास अर्थात २५ फेब्रुवारी सकाळीपर्यंत ही कामे सुरू राहणार आहे. त्यामुळे बुधवारी शहरातील पाच झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिका व ओसीडब्लूने स्पष्ट केले आहे.

जलवाहिनीवर आंतरजोडणीच्या कामामुळे तसेच इतरही किरकोळ कामामुळे गोरेवाडा येथील पेंच-१ जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. परिणामी गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, धंतोली व सतरंजीपुरा या झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा बंद राहील. 

यात गांधीबाग झोनमधील कोठी रोड, गाडीखाना, नवी शुक्रवारी, कर्नल बाग, रामाजीवाडी, सुभाष रोड, घाट रोड, चांडक लेआऊट, जाटतरोडी, इमामवाडा, रामबाग म्हाडा, मेडिकल, उंटखाना, राजाबाक्षा, घाट रोड या परिसरात पाणी मिळणार नाही. धंतोली झोनमध्ये वंजारीनगर, सोमवारी क्वार्टर, रघुजीनगर, हनुमाननगर, रेशीमबाग, पीटीएस क्वार्टर, ओमनगर, शिवनगर, महावीरनगर, आनंदनगर, सुदामपुरी, जुने नंदनवन, नेहरूनगर, कबीरनगर, गायत्रीनगर, अजनी रेल्वे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कुकडे ले-आऊट, बाभूळखेडा, विलासनगर, वसंतनगर तर धरमपेठ झोनमधील बर्डी मेन रोड, नेताजी मार्केट, तेलीपुरा, आनंदनगर, मोदी नं. १,२,३, गणेश मंदिर, रामदासपेठ या भागात पाणीपुरवठा होणार नाही. 

मंगळवारी झोनमधील छावणी, मेकोसाबाग, बैरामजी टाऊन, विजयनगर, न्यू कॉलनी, पागलखाना, गड्डीगोदाम, सदर, नई बस्ती, सिंधी कॉलनी, कडबी चौक, गौतमनगर तर गोरेवाडा जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या नटराज सोसायटी, दर्शन सोसायटी, एकतानगर, नर्मदा सोसायटी, माधवनगर, प्रकाशनगर, उज्वलनगर, गणपतीनगर, शिवनगर, काळे ले-आऊट, जय दुर्गानगर, केशवनगर, वेलकम सोसायटी, राष्ट्रसंतनगर, शबिना सोसायटी, श्रीकृष्णनगर, आशीर्वादनगर, सुमितनगर, गायत्रीनगर, बाबा फरीदनगर, बंधूनगर, एमबी टाऊन १, २ व ३, मातानगर, झिंगाबाई टाकळी वस्ती, गीतानगर, डोये ले-आऊट, आदर्शनगर, मनवर ले-आऊट, साईबाबा कॉलनी, फरस या वस्त्या आहेत.

तर सतरंजीपुरा झोनमधील लष्करीबाग, मेयो हॉस्पिटल, सैफीनगर, हंसापुरी, भगवाघर चौक, मोमिनपुरा, भानखेडा, दादरापूल टिमकी, गोळीबार चौक, कोसारकर मोहल्ला, नंदबाजी डोहा, समता बुद्ध विहार, सपाटे मोहल्ला, दांदरे मोहल्ला, देवघरपुर, गंगाखेत चौक, बाजीराव गल्ली, पाचपावली रेल्वे गेट, मस्कासाथ, इतवारी, मिरची बाजार चौक, टांगा स्टँड, बांगलादेश, उमाटेवाडी, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडी चौक या भागात पाणी बंद राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com