कोरोनापासून बचावासाठी असा वापरा मास्क

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

कोरोना आजारापासून सुरक्षिततेसाठी नागपूर जिल्ह्यात सुमारे 2 लाख मास्क तयार करून शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला पुरविले आहेत. परिस्थिती कुठलीही असो, महिला मागे हटत नाहीत याची पुन्हा एकदा महिलांनी प्रचिती दिली आहे.

नागपूर :कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी घराघरांतील महिलांनी कंबर कसली असून, दैनंदिन कामे आटोपल्यावर घरगुती कापडाचे मास्क तयार करण्यावर अनेकींचा भर आहे. कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या सुरक्षेसाठी मास्क तयार केल्यावर, आता हेच मास्क अत्यंत माफक दरात महिलांनी बाजारपेठेतही उपलब्ध करून दिले आहेत.
कोरोना आजारापासून सुरक्षिततेसाठी नागपूर जिल्ह्यात सुमारे 2 लाख मास्क तयार करून शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला पुरविले आहेत. परिस्थिती कुठलीही असो, महिला मागे हटत नाहीत याची पुन्हा एकदा महिलांनी प्रचिती दिली आहे. मास्कनिर्मितीतून महिलांना रोजगाराची संधीही मिळते आहे.
जुन्या कापडाचे चौकोनी तुकडे कापून त्याला चार बाजूने बंद शिवल्यास घरच्याघरी मास्क तयार करता येऊ शकतो.
सुती कापडाचे मास्क सगळ्यात उत्तम. ते नसतील तर साध्या हातरुमालाचाही मास्क म्हणून उपयोग करता येतो. मात्र हे मास्क स्वच्छ असतील याची खात्री करून घ्या.
मास्क स्वच्छ कसे करणार

मास्क स्वच्छ साबणाने धुवावे आणि साधारण 4-5 तास उन्हात वाळत ठेवावे.

मास्क धुताना पाण्यात मीठ टाकून 15 मिनिट त्यात मास्क भिजवून ठेवा. त्यानंतर मास्क धुवा
प्रेशर कुकरमध्ये पाणी उकळून त्या गरम पाण्यात मास्क धुवा
मास्क सुकवण्यासाठी गरम इस्त्रीचा वापरही करू शकता
मास्क व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करा
तुम्ही घरी बनवलेले मास्क रोजच्या रोज बदलूनही वापरू शकता.

सविस्तर वाचा - धंद्यावर बसविण्याची धमकी देणारी लुटेरी दुल्हन प्रीती दास पोलिसांच्या जाळ्यात
मास्क वापरताना...
मास्क वापरण्यापूर्वी ते व्यवस्थित धुतले आहेत की नाही याची खात्री करून घ्या
मास्क घालण्यापूर्वी हात स्वच्छ साबणाने धुवा
घातलेला मास्क दमट अथवा ओला लागायला लागल्यावर लगेच दुसरा मास्क बदला आणि पहिला धुऊन टाका
मास्क काढत असताना कानाच्या मागच्या बाजूला धरून मगच काढा
मास्क काढल्यानंतरही हात त्वरीत धुवा आणि सॅनिटाईझ करा
साबणाच्या पाण्यात अथवा पाण्यात मीठ घालूनच मास्क धुवा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hand made Cotton mask