धंद्यावर बसवण्याची धमकी देणारी 'लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळ्यात

अनिल कांबळे
शनिवार, 13 जून 2020

प्रीती दासने मोठमोठ्या राजकीय नेत्यांसह त्यांच्या पत्नींसोबत काम केले आहे. त्यासाठी तिने अनेक तडजोडीसुद्धा केल्या आहेत. प्रीतीने पोलिस अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत काढलेल फोटो दाखवून अनेकांना आपल्या हातातील बाहुले बनविले आहे. अनेक गुन्हे दाखल झालेली "लुटेरी दुल्हन' फरार होती.

नागपूर : पोलिस अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी मैत्री करून अनेकांना लाखोंनी गंडा घालणारी तसेच "लुटेरी दुल्हन' नावाने ओळखली जाणारी प्रीती दासला शनिवारी (ता. 13) पाचपावली पोलिसांनी अटक केली. तिने न्यायालयात जामिनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, दिलासा मिळत नसल्याने पाहून पाचपावली पोलिसांना शरण गेल्याचे समजते. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती दास हिच्यावर नागपुरात चार पोलिस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यासह भंडार जिल्ह्यातसुद्धा लाखोंची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही नागपूर शहर पोलिसांनी प्रीतीला पोलिस ठाण्यातील शांतता समितीची सदस्य तसेच पोलिसांच्या अनेक कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते. प्रीती दास काही पोलिस अधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनली होती. याचाच फायदा घेत प्रीती दासने काही महिलांना "धंद्यावर बसवेल' अशा धमक्‍या देणे सुरू केले होते.

क्लिक करा - रविवारची सुटी झाली 130 वर्षांची; रविवारीच सुटी का असते?, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...वाचा

प्रीती दासने मोठमोठ्या राजकीय नेत्यांसह त्यांच्या पत्नींसोबत काम केले आहे. त्यासाठी तिने अनेक तडजोडीसुद्धा केल्या आहेत. प्रीतीने पोलिस अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत काढलेल फोटो दाखवून अनेकांना आपल्या हातातील बाहुले बनविले आहे. अनेक गुन्हे दाखल झालेली "लुटेरी दुल्हन' फरार होती. तिने जिल्हा व उच्च न्यायालयातही धाव घेत अटकेपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. या कामातही काही पोलिस अधिकाऱ्यांनी तिला सहकार्य केले. 

एका पोलिस अधिकाऱ्याने तर तिला पत्नीचा दर्जाही दिला होता तर दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने स्वतःचे एटीएम कार्ड आणि एक प्लॉट घेऊन दिला होता. एका नवनियुक्‍त अधिकाऱ्याने तिला आपल्या फ्लॅटच्या चाव्या देऊन "वेलकम' केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेली प्रीती एका राजकीय पदाधिकारी असलेल्या दाम्पत्याच्या पदराआड लपली होती. मात्र, तिचे अटकेपासून वाचण्याचे सर्वच रस्ते बंद झाल्यामुळे पाचपावली पोलिस ठाण्यात शरण आली आहे.

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"

अनेकांचे धाबे दणाणले

प्रीती दासला अटक होताच शहरातील अनेक पोलिस अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता प्रीती आपल्याही पापाचा भंडाफोड करेल, अशी धास्ती अनेक पोलिस अधिकाऱ्यांना आहे. तर प्रीतीसोबत आनंदाचे गुलाबी क्षण रंगविणाऱ्यांचे तर संसारच उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. प्रीतीला अटक होताच काही पोलिस अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे पंटर पाचपावली पोलिस ठाण्याला घिरट्या घालत असल्याचे चित्र होते. 

प्रीतीचा 'केक' रंगणार

प्रीतीने एका हॉटेलच्या मालकाला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याच हॉटेलमध्ये जंगी पार्टी केली होती. या पार्टीत प्रीतीच्या जवळपास 12 मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. पार्टीत प्रीतीच्या चेहऱ्याला केक लावण्यासाठी एकमेकांमध्ये होड लागली होती. त्या पार्टीचे व्हिडिओ प्रीती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रीतीचा केक अनेकांची झोप उडविणारा ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pachpavli police arrested Preeti Das