दिव्यांगांनी केलं अभिमान वाटावा असं काम; नागपूरकरांनी भरभरून केलं कौतुक 

नरेंद्र चोरे 
Friday, 22 January 2021

प्रदर्शनाबद्दल माहिती देताना फाउंडेशन'च्‍या संस्थापक स्‍नेहल कश्‍यप म्हणाल्या, आमच्या संस्थेशी सहा वर्षांच्या मुलापासून ते ५५ वर्षांच्या सिनियर्सपर्यंत पन्नासावर ऑटिझम व डॉऊन सिंड्रोम आजारांनी ग्रस्त व मूकबधिर दिव्यांग मुले-मुली जुळले आहेत. त्यांना सन्मानाने जगता यावे, या उद्देशाने आम्ही शिवणकाम,

नागपूर : दिव्यांग मुलांना अनेक घरांमध्ये अपेक्षेप्रमाणे चांगली वागणूक मिळत नसली तरी, योग्य संधी मिळाल्यास ते आपले टॅलेंटही दाखवू शकतात. अनेक दिव्यांग मुलांनी खादीच्या कपड्यांवर आकर्षक वारली पेंटिंग चितारून ते सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या या कलेचे नागपूरकरांनी कौतुक केले आहे.

दिव्यांगांनी वारली पेंटिंग केलेल्या खादीच्या साड्या, सलवार-कमीज, कुर्ता व ज्वेलरीचे स्नेहधागा प्रदर्शन रामदासपेठमधील गोंडवाना गॅलरीत सुरू आहे. त्यांच्या या कलेला नागपूरकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना त्यांच्या कारागिरीचे कौतुक केले आहे. या निमित्ताने दिव्यांगांमधील प्रतिभा तर बाहेर आलीच, शिवाय त्यांना पैशांची मदतसुद्धा झाली आहे. 

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

प्रदर्शनाबद्दल माहिती देताना फाउंडेशन'च्‍या संस्थापक स्‍नेहल कश्‍यप म्हणाल्या, आमच्या संस्थेशी सहा वर्षांच्या मुलापासून ते ५५ वर्षांच्या सिनियर्सपर्यंत पन्नासावर ऑटिझम व डॉऊन सिंड्रोम आजारांनी ग्रस्त व मूकबधिर दिव्यांग मुले-मुली जुळले आहेत. त्यांना सन्मानाने जगता यावे, या उद्देशाने आम्ही शिवणकाम, एम्ब्रॉयडरी व पेंटिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. डिझाईन काढून दिल्यानंतर ही प्रशिक्षित मुले सुरत व अन्य शहरांतून आणलेल्या खादी व सुतीच्या कपड्यांवर आकर्षक वारली पेंटिंग करून देतात. त्यामोबदल्यात त्यांना सत्तर टक्के रक्कम दिली जाते, उरलेले पैसे संस्था स्वतःकडे ठेवते. 

दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तू सहानुभूती म्हणून नव्हे, तर त्यांची खरीखुरी मेहनत व बारीक कलाकुसर पाहून खरेदी करतात, असे त्यांनी सांगितले. दिव्यांग मुला-मुलींनी तयार केलेले कपडे व टेराकोटा ज्वेलरी दिल्ली, मुंबई व पुण्यासह देशभरातील अनेक ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये ठेवण्यात आले आहे.

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

दिव्यांग मुलांमध्ये कमालीचे टॅलेंट असते. फक्त त्यांना संधीची आवश्यकता असते. आम्ही नेमके तेच केले. या निमित्ताने दिव्यांगांना थोडेफार पैसे तर मिळत आहेच, शिवाय पालकांचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलू लागला आहे.
-स्‍नेहल कश्‍यप, 
संस्थापक, ये जिंदगी फाउंडेशन

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicap people did paintings on khadi