हवालदार ! तु सुद्धा...लाखोंचा गंडा आणि जेलचे वारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

अनिल नागपुरे आणि सुनील नागपुरे या भावांना महालेखाकार कार्यालयात लेखा व हक्कदारी विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी एकूण 18 लाख 55 हजार रुपये उकळले. आरोपींपैकी काहीजण स्वत: या कार्यालयात कार्यरत असल्याचे भासवितात. तर उर्वरित आरोपी ग्राहक शोधून आणण्याचे काम करतात. आरोपींनी नागपुरे बंधूंनासुद्धा अशाच पद्धतीने जाळ्यात ओढले.

नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील रूपेश भैस्वार (31) आणि बंटी मेंडके (26) दोन्ही रा. गोंडी डिग्रस, ता. काटोल यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आता माजी पोलिस हवालदार विनोद मोहोड (50) रा. गोपालनगर आणि सलीम रहमान शाह दाऊद (40) रा. शास्त्री वार्ड, भंडारा या दोघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

हे वाचाच - तीन मुलांच्या आईला प्रियकराने धोका दिला; आणि झाले विपरित

अनिल नागपुरे आणि सुनील नागपुरे या भावांना महालेखाकार कार्यालयात लेखा व हक्कदारी विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी एकूण 18 लाख 55 हजार रुपये उकळले. आरोपींपैकी काहीजण स्वत: या कार्यालयात कार्यरत असल्याचे भासवितात. तर उर्वरित आरोपी ग्राहक शोधून आणण्याचे काम करतात. आरोपींनी नागपुरे बंधूंनासुद्धा अशाच पद्धतीने जाळ्यात ओढले. सप्टेंबर 2017 मध्ये पैशांची देवाण-घेवाण होऊनही आरोपी नोकरी देत नव्हते. नागपुरे यांनी दबाव टाकल्यानंतर आरोपींनी त्यांना बनावट नियुक्तिपत्र व पोलिस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र तयार करून दिले. नागपुरे बंधू संबंधित विभागात गेले असता नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास करीत असताना अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आलेले अनेक पीडित समोर आले असून फसवणुकीचा आकडा 37 लाखांवर पोहोचला आहे. मोहोड हा वेगवेगळ्या शासकीय विभाग, विविध पदांवर असणारे अधिकाऱ्यांचे शिक्के, लोगो, अशोकस्तंभ असणारे शिक्के व साहीचे बनवटी आणि खोटे नियुक्तीपत्र तयार करून देत होता. त्याला 11 जानेवारीला अटक करण्यात आली. तर सलीमला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी आशीष महाजन, सौरभ आणि प्रशांत काळे अजूनही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handsome! You too ... the mess of millions and the prison winds