वाहरे व्वा ! दिव्यांग आहेत, पण प्रमाणपत्रच नाही ! 

file photo
file photo

वानाडोंगरी (जि.नागपूर)  : हिंगणा तालुक्‍यातील दिव्यांग बांधवांची दयनीय अवस्था आहे. त्यांच्याकडे ना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ना येथील पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. कायदा लागू झाला तेव्हापासून या तालुक्‍यात अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये हा निधीच निर्माण करण्यात आला नाही. असाच प्रकार किरमिटी भारकस या ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे. 

किरमिटी ग्रामपंचायतमध्ये तीन लाख जमा, उपयोग काय? 
या गावात दहा दिव्यांग बांधव आहेत. परंतु, त्यांच्याजवळ दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे ते लाभापासून वंचित आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते गजानन ढाकुलकर यांनी हिंगणा तालुक्‍यातील संपूर्ण ग्रामपंचायतला जेव्हा ही माहिती मागितली. तेव्हा ही संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. त्वरित गावपातळीवर दिव्यांग शोधमोहीम सुरू झाली. अशाप्रकारचा निधी झालेल्या उत्पन्नातून राखीव ठेवावा लागतो. हे त्यांना माहिती अधिकाराच्या अर्जामुळे माहीत झाले. पन्नास हजार लोकवस्ती असलेल्या वानाडोंगरी नगर परिषदेमध्येसुद्धा ढाकुलकर यांच्या अर्जामुळे शोधमोहीम सुरू झालेली आहे. हिंगणा तालुक्‍यातील ग्रामपंचायतमध्येसुद्धा हा निधी आतापर्यंत जमाच करण्यात आला नव्हता. असाच एक प्रकार तालुक्‍यातील किरमिटी (भारकस)या ठिकाणी आढळलेला आहे. या गावात प्रथम अपिलीय अधिकारी तथा आरोग्य अधिकारी पंचायत समिती हिंगणा यांचे आदेश झाल्यानंतर ही माहिती उपलब्ध झालेली आहे. 

किती बरे झाले असते !
या ग्रामपंचायतमध्ये सन-2018-19 या वर्षाचा दिव्यांग निधी हा रुपये दोन लाख 91 हजार 464 इतका जमा आहे. गावात किरमिटीमध्ये तुषार भोजने, प्रज्वल सोनेकर व मंथन पटले तर तुरकमारीमध्ये मिना राऊत व सचिन चावट असे दोन तर टेंभरी या गावात एकूण पाच लाभार्थी आहेत. किरमिटी ही गटग्रामपंचायत आहे. त्यामुळे टेंभरीच्या पुंडलिक राऊत, आदित्य गायकवाड, आतिष ठाकरे, विशाल बिंझाडे व शिवकुमार मेहता यांचा समावेश आहे. 1996 च्या जीआरप्रमाणे दिव्यांग निधी हा तीन टक्‍के होता, तर आता हा पाच टक्‍के झालेला आहे. या दहा लाभार्थ्यांना जर दरवर्षी हा लाभ मिळाला असता तर किती बरे झाले असते. पण, यांना प्रमाणपत्र काढून देणे ही ज्यांची जबाबदारी असेल त्यांनी ही पार पाडावी, अशी या अपंग बांधवांची मागणी आहे. तेव्हा संबंधित शासकीय यंत्रणेने त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. या दहा दिव्यांगामध्ये दोन मतिमंद आहेत. दोन मुके आहेत. दोन अस्थीव्यंग आहेत. एकाला अर्धा हात नाही, तर एकाला बोटे नाहीत. शिवकुमार मेहताला एक हात नाही, अशी त्यांची अशी त्यांची अवस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com