वेदनांच्या ओझ्यासकट कचऱ्यातून नवसृजन; आधारहीन एकाकी कलावंत ‘होजो’ गुंफतो आपुलकीची वीण

hojo was living a lonely life at the train station
hojo was living a lonely life at the train station
Updated on

नागपूर : ‘तो’ कोण, कुठला कुणालाच ठाऊक नाही. मूकबधिर असल्याने भावनाही अव्यक्त. जपलेल्या छंदाखाली एकाकीपणाला गाडून घेतले आहे. पॅकिंग वायरचे तुकडे गोळा करून आकर्षक आणि मजबूत पिशव्या तयार करतो. वेदनांच्या ओझ्यासकट कचऱ्यातून नवसृजनाचा हा ध्यास त्याने अनेक वर्षे जपला आहे. किंबहुना, तेच त्याच्या जगण्याचे कारण ठरावे. नागपूर रेल्वे स्थानकावरील एका कोपऱ्यात तो आपुलकीची उसवलेली वीण घट्ट करीत बसलेला असतो. कुणाशी बोलत नसला तरी केवळ मिचमिच्या डोळ्यांनी तो कटाक्ष टाकत बरेच काही बोलून जातो.

रेल्वेचे विश्वच वेगळे. लाखो प्रवाशांची धावपळ, अफाट गर्दी असूनही प्रत्येकजण एकटा असतो. परंतु, निराधारांसाठी हेच विश्व आधार देणारेही ठरते. अनेकजण या विश्वात हरखून जातात. खुज्या उंचीचा, हसऱ्या चेहऱ्याचा ‘होजो’सुद्धा त्यातीलच एक. त्याला फारसे कुणी ओळखत नाहीत. पण, नागपूर रेल्वे स्थानकावरील जुनी जाणती मंडळींचा तो परिचित आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी तो येथे आला. ‘होजो’ ही ओळखही इथेच मिळाली. न मागताही दोन वेळच्या जेवणासह गरजेचे सारे त्याला मिळते.

मनातील वेदना मात्र तो व्यक्त करू शकत नाही. वेळ घालविण्यासाठी विणकामाचा छंद त्याने जपला आहे. पार्सल ऑफिसमधून पॅकिंग वायर गोळा करून आणतो. त्यातून पिशव्या आणि किचेन साकारतो. एकाकी कोपऱ्यात तासन तास तो मान खाली घालून त्यातच गुंतलेला असतो.

मनातील दुःख व्यक्त होऊ नये यासाठीची ती धडपड असावी कदाचित. ओळखीची मंडळी किंवा मदत करणारे दिसताच तयार केलेले साहित्य भेट देतो. मदत करणाऱ्या कुणालाही तो कदापी विसरत नाही. त्याने कुणाला पैशांसाठी त्रास दिल्याचे कुणाच्याच स्मरणात नाही. व्यसनाधिनांच्या सानिध्यात राहूनही व्यसनापासून तो लांबच राहिला.

खाकीतील माणुसकीचा ‘तो’ही चाहता

शांत स्वभावाचा ‘होजो’ लोहमार्ग पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा चाहता. म्हणूच आपल्या डब्यातील घासातून घास काढून त्याला देतात. कधी पाच, दहा रुपयेसुद्धा त्याच्या हातात देतात. यामुळे होजोसुद्धा त्यांच्यासोबत चांगलाच फ्रेंडली झाला आहे. पोलिसांच्या सानिध्यातच त्याचा वावर असतो. पोलिस जमण्याच्या जागे नजीकच्या कोपऱ्यातच त्याने ठिया जमविला असून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसून तो विणकामात मग्न असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com