
नागपूर : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व बार आणि रेस्टॉरेंट बंद करण्याचे आदेश दिले असतानाही आपले कोणी काही बिघडऊ शकत नाही या थाटात सुरू असलेल्या बजाजनगर काचीपुरा येथील सुजल सावजीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धाड टाकली. येथे मोठमोठ्या गंजात शिवजलेले मटण, चिकन जप्त करण्याचे आदेश गृहमंमत्र्यांनी दिले. यासोबतच सदर येथील एका प्रसिद्ध हॉटेलवरही धाड घालण्यात आली.
जिल्हाधिकारी यांनी आदेश देताच पाच वाजतापासून पोलिसांच्या चमूंनी सर्व रेस्टॉरेंट, बार, पानटपऱ्या बंद केल्या. बजाजनगरातील पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. यानंतरही आज दिवसभर सुजल सावजी सुरू होते. अनेक ग्राहक तेथे बसले होते. सर्रास त्यांना भोजन दिले जात होते. याच हॉटेलच्या शेजारी असलेल्या पान व चहा टपऱ्या पोलिसांनी दुपारी बंद केल्या. संपूर्ण परिसरात शुकशुकाट होता. हे बघता सुजल सावजीकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. कोणीतरी याची माहिती गृहमंत्र्यांना दिली. पोलिसांचा ताफा घेऊनच गृहमंत्री निघाले. सुजल सावजीचे सर्व साहित्य व भोजन सामग्री जप्त करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेस दिले. याशिवाय सदर भागातील एक प्रतिष्ठित रेस्टॉरंटही दिवसभर सुरू होते.
सविस्तर वाचा - किलोभर पीठ, किलोभर तांदुळ घेतले उधारीवर, कोरोनामुळे हातातोंडाची भेट कठीण
गृहमंत्र्यांनी धाड टाकली तेव्हा रेस्टॉरंट बंद असून मिठाई विक्री केली जात असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी रॅस्टॉरंटमध्ये अनेक ग्राहक बसले होते. गृहमंत्र्यांनी काऊंटवरचा बिलांचा गठ्ठा ताब्यात घेऊन तपासला तेव्हा हॉटेल चाकल घाबरला. कारवाई करून ताबोडतोब रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.