गृहमंत्र्यांचा फोन अन्‌ कुटुंबीयांनी दर्शवली मृतदेह स्वीकारण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

मृत्यूची वार्ता समजताच सर्वत्र संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. आमच्या मुलीने सात दिवस सहन केले. सात दिवसांची मुलीची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. आता आरोपीला आमच्या ताब्यात द्या व आमच्या समोर जाळा. आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे करा, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली. 

नागपूर : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी सकाळी 6.55 निमिटांनी हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सरकारकडून योग्य ती मदत व आरोपीला फाशी मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन करून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि भावाला नोकशी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. 

पीडिता मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती. तीन फेब्रुवारीला नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना युवकाने पेट्रोल टाकून जाळले होते. तेव्हापासून तिच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सात दिवसांनी म्हणजे सोमवारी (ता. 10) तिची झुंज अपयशी ठरली व मृत्यू झाल्याचे डॉ. राजेश अटव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितली. 

मृत्यूची वार्ता समजताच सर्वत्र संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. आमच्या मुलीने सात दिवस सहन केले. सात दिवसांची मुलीची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. आता आरोपीला आमच्या ताब्यात द्या व आमच्या समोर जाळा. आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे करा, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली. 

चौका-चौकात बंद, शाळा महाविद्यालय बंद

हिंगणामधील पीडितेचा मृत्यू झाल्याचे समजताच चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हिंगणघाट येथील शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच हिंगणघाट शहरातील व्यापारी प्रतिष्ठानही बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरातील मोठा जनसमुदाय घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर उतरला होता. हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊंटर करा, अशी मागणी सामान्यांकडून झाली होती. लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही बंदमध्ये मध्ये सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh comforted