डासांचा त्रास होतोय? करा हे घरगुती उपाय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

डासांपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. कॉइल, रिपेलेंट्स, मॅट किंवा लिक्विड इ.चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो. आणि काही दिवसांनंतर डास या उपायांनाही जुमानत नाहीत. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय करून पाहता येतील.

नागपूर ; पावसाळ्यात डासांचा त्रास खूप वाढतो आणि परिणामी आजारांचे प्रमाणही खूप वाढते. झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे दिवसभर अस्वस्थता राहते. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारखे गंभीर आजार डासांमुळे मोठ्या प्रमाणात पसरतात.

डासांपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. कॉइल, रिपेलेंट्स, मॅट किंवा लिक्विड इ.चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो. आणि काही दिवसांनंतर डास या उपायांनाही जुमानत नाहीत. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय करून पाहता येतील.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरात स्वच्छता ठेवली पाहिजे. आजुबाजुच्या परिसरात पावसाचे पाणी साठू देऊ नये. नाहीतर डासांचे प्रमाण वाढते.

* कडुलिंबाचे तेल आणि कापूर यांचं मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरुन हा स्प्रेस रात्री झोपण्यापूर्वी घरभर मारल्यात डास घरातून पळून जातील.

* दार आणि खिडक्या बंद करून कापूर जाळल्यास डास पळून जातील.

* झोपताना कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळा अन् त्याचा दिवा लावावा किंवा ते तेल अंगाला लावावे. यामुळे डास जवळही फिरकणार नाहीत.

* तुळशीच्या पानांचा रस अंगाला लावल्यास डास चावत नाहीत.

* पुदिन्याचा उग्र गंधामुळेही डास दूर पळतात. रात्री झोपण्याआधी हाता-पायांना १-२ पुदिन्याची पानं चोळावी.

पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण

* लसणाच्या कळ्या पाण्यात टाकून चांगल्या उकळून घेऊन हे पाणी घरात शिंपडा.. लसणाच्या तिखट वासांमुळे डास घरात येणार नाही.

* सरसोच्या तेलात ओव्याची पुड मिसळून त्याचा दिवा लावल्यास डास दूर पळतात.

* लिंबाचा रस आणि निलगिरीचे तेल एकत्र करून त्याची वात पेटवल्यास डास दूर पळतात.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home remedies on mosquito bite