लॉकडाउनमध्ये गृहिणींनी सातासमुद्रापार पोहोचवली रेसिपी, काय केल बघाच...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

भारतीय खाद्य पदार्थांना एक परंपरा आहे. अनेकांना माहित नसल्याने ही खाद्य संस्कृती लुप्त होते की काय अशी भीती आहे. यातील अनेक गृहिणींनी या खाद्य पदार्थांची परंपरा या माध्यमातून जगभरात पोहोचविली. त्यासाठी काही तरुणी, महिलांनी स्वतःचे यू ट्यूब चॅनल सुरू केले.

नागपूर : लॉकडाउनमुळे बाहेर जाणेच बंद झाल्याने निराश होण्यापेक्षा अनेक गृहिणींनी सोशल मीडियावर पाककृतीचे व्हिडिओ "अपलोड' करीत भारतीय खाद्य पदार्थांसोबतच स्वयंपाकघरही ग्लोबल केले आहे. काही महिला, तरुणींनी थेट यू ट्यूब चॅनल सुरू करून त्यावर खमंग व्यंजन तयार करताना तसेच पाककृतीची माहितीही देताना दिसून येत आहेत. 

लॉकडाउनच्या काळात मोबाईल अनेकांच्या विरंगुळ्याचे साधन झाले. अनेक महिलांचे पती वर्क फ्रॉम होममुळे घरीच होते. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार दररोज काही ना काही पदार्थ स्वयंपाक घरात तयार केले जात होते. अखेर काही महिलांनी पतीच्या "कटकटी'तूनही ग्लोबल होण्याची संधी शोधली. पतींसाठी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे फोटो काढून फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यास अनेकांनी सुरुवात केली.

सविस्तर वाचा - बापरे! विलगीकरणात महिलेला आली पाळी, संबंधिताने सॅनिटरी पॅड ऐवजी दिले हे...

काहींनी फोटो पोस्ट करण्याऐवजी विविध व्यंजन तयार करताना त्याचे मोबाईल व्हिडिओद्वारे चित्रीकरण केले. संबंधित पदार्थ कसा तयार केला, याबाबत थोडीफार माहिती लिहित ते व्हिडिओ पोस्ट केले. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर विविध खाद्यपदार्थांच्या फोटोंचा आणि व्हिडिचा महापूर आला. विशेष म्हणजे गृहिणींच्या या व्हिडिओ व फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्‍सही मिळाले. मात्र, काही महिला, तरुणींनी यापुढेही विचार केला. 

भारतीय खाद्य पदार्थांना एक परंपरा आहे. अनेकांना माहित नसल्याने ही खाद्य संस्कृती लुप्त होते की काय अशी भीती आहे. यातील अनेक गृहिणींनी या खाद्य पदार्थांची परंपरा या माध्यमातून जगभरात पोहोचविली. त्यासाठी काही तरुणी, महिलांनी स्वतःचे यू ट्यूब चॅनल सुरू केले. केवळ लिखित माहिती पोस्ट करण्याऐवजी ते पदार्थ करून दाखवून त्याबाबतच्या पाककृतीची माहितीही देण्याबाबतचे अनेक नागपूरकर महिलांचे व्हिडिओ यू ट्यूबवर दिसून येत आहेत.

असे का घडले? - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

लॉकडाउनच्या काळात घरात पतींच्या खाद्य पदार्थाच्या मागण्या पूर्ण करतानाच या महिलांनी स्वतःसाठी व्यासपीठही तयार केले. लॉकडाउनमुळे निराश होण्याऐवजी त्याची संधी म्हणून वापर करणाऱ्या स्नेहल पराये पाटनकर यांनीही स्नेहल की रसोई' या नावाने स्वतःचे यू ट्यूब चॅनल सुरू केले. आतापर्यंत त्यानी दही खस्ता पुरी, राईस चिला, छोला भटुरा यासह अनेक खाद्य पदार्थांची पाककृती माहितीसह जगभरात पोहोचविली. सुरुवातीला अल्प प्रतिसाद असला तरी आत्मविश्‍वास वाढविण्यास तो पुरेसा ठरला. दिवसेंदिवस त्यांचे "सबस्क्राईबर' वाढत आहेत. स्नेहल यांच्याप्रमाणेच अनेकींनी हा पर्याय निवडला आहे. 

वेळेचा सदुपयोग 
वेगवेगळे खाद्य पदार्थ तयार करण्याची हौस आहेच. लॉकडाउनच्या काळात सर्व घरातच असल्याने विविध खाद्य पदार्थ तयार करीत असताना त्याबद्दलची माहिती इतरांपर्यंत पोहोचावी, असा एक विचार आला. फेसबुकवर फोटो अपलोड खूप केले. परंतु, त्यापेक्षाही आपले खाद्यपदार्थ जगभरात पोहोचावे, यासाठी यू ट्यूब चॅनल सुरू केले. वेळेचा सदुपयोग करीत भारतीय खाद्य संस्कृती जगभरात पोहोचवित असल्याचे समाधान आहे. 
- स्नेहल पराये पाटणकर, गृहिणी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housewives made the kitchen global through social media