बापरे! विलगीकरणात महिलेला आली पाळी, संबंधिताने सॅनिटरी पॅड ऐवजी दिले हे...

Embarrassing type with women in the quarantine center in Nagpur
Embarrassing type with women in the quarantine center in Nagpur

नागपूर : विदर्भात अकोला, अमरावती व नागपूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. रोज दोन अंकीमध्ये रुग्णांची वाढत होत असल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढत आहे. दुसरीकडे मृत्यूचा आकडाही फुगत चालला आहे. लॉकडाउन शिथिल झाल्याने यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. एखाद्या परिसरात रुग्ण आढळल्यात नागरिकांना विलगीकरण्यात टाकण्यात येत आहे. नागरिक जास्त असल्याने नानाविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशात मासिक पाळी आलेल्या महिलेसोबत वेगळास प्रकार घडल्याने उघडकीस आले आहे. 

शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात नागरिकांना ठेवले आहे. त्यांचे अहवाल यायला वेळ लागत आहे. यामुळे विलगीकरणातील नागरिकांची चिडचिड चांगलीच वाढली आहे. नाहक त्रास होत असल्याची ओरड त्यांच्याकडून होत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत असल्याचे समोर येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असलेल्या संशयित नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वनामती विलगीकरण कक्षातील एका महिलेला मासिक पाळी आली. यामुळे महिलेने संबंधिताकडे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बंदोबस्तातील काही वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला चक्‍क लहान मुलांना वापरले जाणारे "हगीज'चे पॅकेट उपलब्ध करून दिले. 

विलगीकरण कक्षात काही सामाजिक संस्था मदतीसाठी व समुपदेशनासाठी गेल्या असता महिलांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर उघड केल्या. यानंतर शहरातील रूबी फाउंडेशनच्या रुबिना पटेल यांनी समाजसेवी संस्थाच्या मदतीने सॅनिटरी पॅडची व्यवस्था करून दिली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

महिल्या झाल्या संतप्त

विलगीकरण कक्षात नागरिकांना ठेवण्यात आले आहे. यात महिलांचाही समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने संपर्कात आलेल्यांच यादी वाढतच चालली आहे. यामुळे चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. याचा महिलांना सर्वाधिक त्रास होत आहे. मासिक पाळी महिलांची ठरलेली. नियाजित वेळेत ती येणारच. अशीच पाळी विलगीकरणातील महिलेला आली. तिने सॅनिटरी पॅड उपब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, तिला चक्क लहान मुलांचे हगीजचे पॅकेट पुरविण्यात आल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. यानेच काम भागवा असा सल्ला दिल्याने तेथील महिला संतप्त झाल्या. 

बाथरूममध्ये पाण्याची कमतरता

विलगीकरण कक्षात पाण्याची कमतरता आहे. बाथरूम, बेसिन येथे पाणीच उपलब्ध नसल्याचे महिलांनी सांगितले. परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला म्हणून वस्तीतील नागरिकांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. 14 दिवस क्वारंटाइन ठेवण्यात आल्याने महिलांना अनेक अडचणी येत आहे. सोबत कपडे, ब्रश आदी आवश्‍यक साहित्य नसल्याचे महिलांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com