प्रेम म्हणजे प्रेम असतं...समलिंगी जोडप्यांचा कसा असतो "व्हॅलेंटाईन्स डे'? वाचा

gay love
gay love

नागपूर : समाजाच्या साऱ्या रितीभाती विसरून आम्ही एकमेकांबरोबर व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार आहोत. एकमेकांना भेटवस्तू देऊन दूरवर फिरायला जाऊन आणि आवडीचे पदार्थ खाऊन आम्ही आजचा दिवस संस्मरणीय करणार असल्याचे समलिंगी आकाशने सांगितले.


व्हॅलेंटाईन्स डे हा प्रत्येकासाठीच खास असतो. प्रत्येकजणच काहीतरी विशेष करून वेगळेपणाने हा दिवस साजरा करीत असतो. कुणी आपल्या प्रिय व्यक्‍तीला भेटवस्तू देतात, तर कुणी बाहेर जेऊन प्रेमदिवस साजरा करतात. कोणी लॉंग ड्राईव्हला जाते. समलिंगी संबंधांना अनेक देशातील न्यायव्यवस्थेने मान्यता देऊनही निदान भारतात तरी हे संबंध समाजाने उघडपणे स्विकारलेले नाहीत. त्यामुळे काही समलिंगी जोडपी उघडपणे हे संबंध जाहीर करतात, तर काही मात्र चोरटेपणे हे संबंध जपतात. मात्र व्हॅलेंटाईन डे हा त्यांच्यासाठीही खासच असतो.

केवळ लग्न हा काही एकमेकांवरील प्रेमाचा पुरावा नाही. प्रेमाची ताकदसुद्धा एकमेकांना बांधून ठेवायला पुरेशी असते. महाविद्यालयीन जीवनातच माझ्या जीवनात माझा जोडीदार आला. आमच्या घरच्यांनीही आमचे संबंध स्विकारले आहेत आणि आम्ही दोघेही एकमेकांबरोबर खूप खुश आहोत. समाज समलिंगी संबंधांकडे अजूनही वाईट नजरेने बघतो. हे खूप त्रासदायक आहे. समाजाने समलिंगींकडे सकारात्मकतेने बघायला हवे. असेही पंचविशीतील आकाश म्हणाला.


आजवर माझ्या आयुष्यामध्ये अनेक मुले आलीत. मात्र, त्या सगळ्यांपेक्षा माझा हा साथीदार अगदी वेगळा आहे. त्याने माझी ओळख त्याच्या घरच्यांशी करुन दिली. ही गोष्ट माझ्या मनात घर करून गेली. त्याची आई मला त्यांचा दुसरा मुलगा मानते. पैसा खर्च केल्याने प्रेम मिळत नाही. इतरांप्रमाणे आम्हालाही प्रेमाचे दोन शब्द प्रेम पुरेसे असतात.


मुलांचे आकर्षण माझ्यासाठी संघर्ष
शालेय जीवनामध्ये मला माझ्यातल्या समलिंगी आकर्षणाची ओळख होऊ लागली होती. माझे मित्र मुलींकडे पाहून कमेंट करायचे. मात्र, मला नेहमी मुलांचेच आकर्षण असायचे. हा माझ्यासाठी संघर्षाचा काळ होता. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माझे जीवन बदलले. अनेक मुलींचे मला प्रपोजल येत असताना माझी ओढ मुलांकडे होती. अशातच सोशल मीडीयाच्या माध्यमातून मला माझा जोडीदार मिळाला.
आकाश, समलिंगी तरुण  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com