hurricane was discussed on TV on Wednesday, not Corona
hurricane was discussed on TV on Wednesday, not Corona

मी टीव्ही बोलतोय... तब्बल तीन महिन्यांनी एक दिवसासाठी झालो 'कोरोना'मुक्‍त, कसं वाचा...

नागपूर : मी टीव्ही... ओळखलं का?... खरं सांगा बरं... विसरले असाल तर आपला परियच देतो... मला काहीही वाईट वाटणार नाही... काय राव, काय गोष्ट करता... असं तर नोको म्हणा... बरंबरं... आहे वाटते ओळख... सोशल मीडियामुळे तुम्ही विसरले असाल असा माझा गैरसमज झाला होता... तसही मी आता तुम्हा लोकांसाठी फार जुना झालो आहे, नाही का?... तरी तुम्ही मला लक्षात ठेवलं त्याबद्दल धन्यवाद... खरंच खूप मोठा धन्यवाद... तुम्हाला माहिती आहे तीन महिन्यांपूर्वी मलाही कोरोनाची लागण झाली होती... मात्र, बुधवारी मी एक दिवसासाठी का होईना कोरोनामुक्‍त झालो... कुणामुळे हेच तुम्हाला सांगायच होतं... चला बोलाव म्हटलं तुमच्या शी अन्‌ सांगाव आपली कहाणी... 

माझा जन्म झाला तेव्हा मी दिसायला फार सुंदर नव्हतो. सावळा होतो. तसेच खूप लठ्ठही होतो. तरी तुम्ही मला आपल्या घरी जागा दिली. माझा लठ्ठपणा सहन केला. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच मी इतके वर्ष जगू शकलो. कालांतराने माझ्यात बदल होत गेले. माझ्या सागळा रंग कलरफूल झाला. तेव्हा तुम्ही मला चक्‍क डोक्‍यावरच घेतले. मी कलरफूल झालो आणि तुमच्या खिशाला कात्री लागली. कारण, मला घरी आणण्यासाठी तुम्हाला अधिकच पैसे खर्च करावे लागले. तरी तुम्ही माझ्यावरील प्रेम करी होऊ दिले नाही.

कालांतराने मी सरपातळ झालो. तेव्हा माझी मागणी अधिकच वाढली. तरीही तुम्ही मला विसला नाहीत. अधिकचे पैसे देत मला विकत घेत होते. आजही घेत आहात यात काही शंका नाही. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. इतक्‍या वर्षांपासून मी तुम्हाला जगभरातील बातमी दाखवत आलो आहोत. तुम्ही बातम्या, सिरिअल, क्रीडा, मालीका चित्रपट आदी पाहण्यासाठी माझ्यापुढे गर्दी करीत होते. याचा मला आनंद होत होता. सोशल मीडियामुळे माझी मागणी कमी झाली असली तरी कोणी विसरलेला नाही. मी प्रत्येकाचा घरी आजरी आहे. दिसलायला सुंदर आणि सरपातळ असा... बरोबर ना... 

मात्र, मागील तीन महिन्यांपासून मी तुमचे मनोरंजन करू शकलो नाही. तुम्हाला विविध गोष्टी दाखवू शकलो नाही. कारण, माहिती आहे का? असेलच... तरीही सांगून देतो. मला कोरोना झाला होता. हो कोरोना झाला होता. विश्‍वास बसेल ना... चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले. याचा आपल्या देशावरही परिणमा झाला. यामुळे जिकडे-तिकडे नुसती कोरोनाचीच चर्चा सुरू झाली. 

याचा परिणाम माझ्यावरही झाला. मी तुम्हाला कोरोना विषाणूच्या बातम्यांशिवाय दुसर काहीही दाखवू शकलो नाही. याच मला दु:ख आहे. मात्र, काहीही इलाज नव्हता. कारण, हा विषाणू इतका भयानक आहे की दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. यामुळे काही लोकांनी माझा रागही करायला सुरुवात केली. टीव्हीत नुसत कोरोना दाखवते. बंद करा, असे म्हणून मला दूर केले. परंतु, याचा मला मुळीच राग आला नाही.

मात्र, बुधवारचा दिवस याला अपवाद ठरला. एकदिवसासाठी का होईना मी कोरोनामुक्‍त झालो. देशात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोरोनाला मागे टाकले. काल दिवसभर निसर्ग चक्रीवादळाचीच चर्चा होती. त्यामुळे मी एक दिवसासाठी कोरोनामुक्‍त झालो आणि तुम्हाला काही नवीन सांगू शकलो. चक्रीवादळाची बातमी तितकी चांगली नसली तरी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या विषयाला यामुळे का होईना ब्रेक मिळाला. याचा मला आंनद झाला. हाच आनंद आज तुमच्यासोब शेअर करण्याची इच्छा झाली म्हणून मी बोलतो झालो. तुम्हीही मला ऐकल याचा आनंद आहे. माझ्याशी जुळून राहा हीच एक विनंती... 

मनोरंजनापासून नागरिक दूर

कोरोनाने देशात शिरकाव केल्यानंतर टीव्ही काहीही पाहायला मिळत नाही आहे. सर्वीकडे फक्‍त आणि फक्‍त कोरोनाचीच चर्चा आहे. क्रीडा, मनोरंजन, चित्रपट आदी बघायलाच मिळत नाही आहे. जुनच काहीतरी सतत दाखवण्यात येत आहे. यामुळे नागरिक पार कंटाळले आहेत. आता हे कितीदिवस सुरू राहणार हे मात्र कुणी सांगू शकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com