esakal | मूलबाळ नसल्याने पत्नीने केली आत्महत्या; विरहात पतीनेही लावला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

Husband commits suicide after wife's death

विष्णू सुखदेव व्यास हे कुटुंबासोबत शेजारीच राहतात. बराच वेळपासून रवींद्र यांची कोणतीच हालचाल नसल्याने त्यांनी आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले.

मूलबाळ नसल्याने पत्नीने केली आत्महत्या; विरहात पतीनेही लावला गळफास

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पती-पत्नीचे एकमेकांवर जिवापाड प्रेम... मूलबाळ नसल्यामुळे दोघेही दुःखी... तरीही एकमेकांना धीर देत सुरळीत संसार सुरू होता... मात्र, पत्नीने नैराश्‍यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे एकाकी पडलेल्या पतीनेही गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. रवींद्र सुखदेव व्यास (रा. न्यू ठवरे कॉलनी, मिसाळ ले-आऊट) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र व्यास हे आयकर विभागातून सेवानिवृत्त होते. त्यांना मूलबाळ नव्हते. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली होती. पत्नीच्या निधनाने रवींद्र यांना मोठा धक्का बसला. ते दारूच्या आहारी गेले. एकटेपणामुळे ते तणावात रहात होते. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांनी राहते घरी छताच्या पंख्याला दुपट्टा बांधून गळफास लावला.

सविस्तर वाचा - अर्ध्यारात्री बोलावले तरी यावेच लागेल!, श्रीमुखात लगावली

त्यांचे मोठे भाऊ विष्णू सुखदेव व्यास हे कुटुंबासोबत शेजारीच राहतात. बराच वेळपासून रवींद्र यांची कोणतीच हालचाल नसल्याने त्यांनी आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. जरीपटका पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला.

मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही

रवींद्र यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. एकटेपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top