अर्ध्यारात्री बोलावले तरी यावेच लागेल!, श्रीमुखात लगावली

संतोष ताकपिरे
Thursday, 22 October 2020

टवाळखोराने धमकी देताना अर्ध्यारात्री भेटायला बोलवेल तेंव्हा यावेच लागेल, अशा शब्दात धमकी देत पीडितेच्या श्रीमुखात लगावली.

अमरावती : टवाळखोराने धमकी देताना अर्ध्यारात्री भेटायला बोलवेल तेंव्हा यावेच लागेल, अशा शब्दात धमकी देत पीडितेच्या श्रीमुखात लगावली. मुलालासुद्धा फोन करून दोघांमध्ये आल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

अंजनगावसुर्जी ते बोराळा मार्गावरील एका देवीच्या मंदिरासमोर ही घटना घडली. विजय टेहरे, असे धमकी देणाऱ्या संशयित युवकाचे नाव आहे. पीडिता ही पतीपासून अनेक वर्षांपासून वेगळी राहते. विजयने तिला फोन करून भेटण्याकरिता मंदिराजवळ बोलविले. पीडिता भेटण्यासाठी गेली असता तिला विजयने पुन्हा अर्ध्यारात्रीही बोलावेल तेव्हा भेटीसाठी यावेच लागेल, या शब्दात दम भरला. मुलामुलींना सोडून देण्यास त्याने बजावले. तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचाही त्याने प्रयत्न केला. पीडितेच्या मुलाला सुद्धा दोघांत अडथळा निर्माण केल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने अंजनगावसुर्जी ठाण्यात दाखल तक्रारीत केला. प्रकरणी पोलिसांनी त्या युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

वाचा - मास्टर माइंड’ दुचाकीचोरटा अटकेत, घरासमोरून उडवायचा बाईक

विवाहितेच्या (वय ३३) छेडखानीची दुसरी घटना अंजनगावसुर्जी येथील पांढरी थांब्याजवळ घडली. पीडित ही दुचाकीने पांढरीवरून अंजनगावसुर्जीकडे जात असताना थांब्याजवळ संशयित आरोपी आशीष पाटील याने तिला रस्त्यात अडविले. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने प्रतीकार केला असता, आशीषने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून अंजनगावसुर्जी पोलिसांनी आशीष पाटील विरुद्ध विनयभंगासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
नाही म्हटल्यावर भेटीसाठी तो आतुर...

ग्रामीणप्रमाणे शहरात युवतीच्या (वय २०) छेडखानीची घटना घडली. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत युवतीच्या घरासमोर जाऊन तिच्यापुढे भेटीचा प्रस्ताव ठेवला. तिने नकार देताच त्याने दुसऱ्यांदा सोबत चालण्यास म्हटले. दुसऱ्यांदाही दुर्लक्ष करताच त्याने तिच्याशी बळजबरीचा प्रयत्न केला. पोलिसांनी संशयित आरोपी शुभम मोर्या (वय २३, रा. चिंचफैल) विरुद्ध गुन्हा दाखल केला.
संपादन - नरेश शेळके

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Abuse Woman, also slap