लग्न होऊन झाले सहाच महिने अन्‌ पत्नीने दाखवले 'रूप', मग पतीने घेतला हा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

आकाश हा पत्नीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळला होता. त्यामुळे त्याने शुक्रवारी दुपारी एक वाजता विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्यानंतर त्याला भावाचा फोन आला. त्याने भावाला विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यामुळे भावाने धावत पळत येऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नागपूर : माहेरचा हस्तक्षेप, स्मार्टफोनचा वाढता वापर, विवाहबाह्य संबंध, अहंकारी, चिडखोर स्वभाव आदी कारणांनी पत्नी ऐकत नाही म्हणून दोन वर्षांत तब्बल 595 पुरुषांनी पत्नीविरोधात नागपूरच्या भरोसा सेलकडे तक्रारी केल्या आहेत. विवाहात अन्याय फक्त स्त्रियांवरच होतो असे नाही. काही स्त्रियाही सासरच्या लोकांसह पतीला वेठीस धरत असल्याचे भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींतून स्पष्ट झाले आहे. अशाच एका घटनेत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. आकाश घोंगडे (वय 30, रा. टेकानाका, मानवनगर) असे मृत्यू पावलेल्या पतीचे नाव आहे. 

आकाश घोंगडे याचे इलेट्रॉनिक्‍स वस्तू विकण्याचा व्यवसाय आहे. त्याचा गेल्या दीड वर्षांपूर्वी विवाह झाला. मात्र, लग्नाच्या सहा महिन्यानंतरच पत्नीसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतच होता. संयुक्‍तिक कुटुंबात राहणाऱ्या घोंगडे यांच्या नातेवाईकांनी दोघांचीही अनेकदा समजूत घालून संसाराची नीट घडी बसवली होती. तरीही पती-पत्नीत वाद होत होता.

हेही वाचा - दारूबंदीच्या नफा-तोट्याचा अभ्यास!

आकाश हा पत्नीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळला होता. त्यामुळे त्याने शुक्रवारी दुपारी एक वाजता विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्यानंतर त्याला भावाचा फोन आला. त्याने भावाला विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यामुळे भावाने धावत पळत येऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती एपीआय पाटील यांनी दिली. आकाश याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

wife atyachar साठी इमेज परिणाम

माहेरचा हस्तक्षेप

पत्नी नोकरी करणारी असो वा घर सांभाळणारी स्मार्टफोनच्या वापरावरून पती-पत्नीत वाद होताना दिसतो आहे. पत्नी घरात मुलांना, आई-वडिलांना कमी वेळ देते, सतत सोशल मीडियावर सक्रिय असते, या कारणावरून वादाला सुरुवात होऊन भांडण विकोपाला जाण्याची अनेक उदाहरणे आहेत. याशिवाय पत्नीच्या माहेरच्या लोकांचा नको तितका हस्तक्षेप होत असल्यानेही पतीला चुकीची वागणूक दिली जात असल्याचे बहुतांश तक्रारींचा सूर आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना न्याय्य हक्क प्रदान करण्याचे काम केले जाते. मात्र, या केंद्रात केवळ महिलाच नाही तर पीडित पुरुषांनीसुद्धा आता धाव घेणे सुरू केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband commits suicide due to wife's Persecuted